ETV Bharat / state

पेण नगरपालिका निवडणुकीत दडपशाही चालू देणार नाही - शिशिर धारकर - shishir dharkar press conference

खोपोली संघर्ष समितीच्या माध्यमातून ठेवीदारांनी न लढता पेण अर्बन बँकेचे (Pen Urban Bank) मुख्य ठिकाण पेण असल्याने पेणकरांनी एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे. संघर्ष समिती ठेविदारांच्या हिताचे काम करीत नाही असेही धारकर यांनी सांगितले.

shishir dharkar
shishir dharkar
author img

By

Published : Feb 20, 2022, 7:55 PM IST

पेण-रायगड - मागच्या दहा वर्षांपासून पेण नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांवर सत्ताधाऱ्यांनी दडपशाही सुरू केली आहे. ती दडपशाही यापुढे चालू देणार नाही, असे वक्तव्य शिशिर धारकर यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी पुढे बोलताना शिशिर धारकर म्हणाले की, शहरातील अनेक विकास कामांबरोबर रिंगरोड आणि जागांवर टाकलेले आरक्षण यामधून कोट्यावधी रूपये कमविले असून आपल्या स्वार्थासाठी रवि पाटील राजकारण करीत आहेत.

shishir dharkar
धारकर माध्यमांशी बोलताना

पेणच्या जनतेने यांच्यावर अधिक विश्वास न ठेवता वेळीच सावध होणे गरजेचे आहे. पेण अर्बन बँकेच्या बाबतीत मी स्वतः ठेवीदारांना पैसे मिळण्यासाठी प्रयत्न करीत असून सध्या न्यायालयीन लढा सुरू आहे. त्यामुळे त्यात अधिक बोलणे उचित ठरणार नाही, परंतु पेणकरांना या सर्व गोष्टींचा उलगडा व्हायला पाहिजे. खोपोली संघर्ष समितीच्या माध्यमातून ठेवीदारांनी न लढता पेण अर्बन बँकेचे (Pen Urban Bank) मुख्य ठिकाण पेण असल्याने पेणकरांनी एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे. संघर्ष समिती ठेविदारांच्या हिताचे काम करीत नाही असेही धारकर यांनी सांगितले.

शिशिर धारकरांचे आरोप

रवि पाटीलांचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी चार दिवस अगोदर सांगितले की अर्बन बँकेत माझे १० लाख रुपये अडकले आहेत ते शिशिर धारकर यांनी पहिले द्यावे आणि नंतरच बॅकेंबाबत बोलावे. मात्र खोटे असून २३ सप्टेंबर २०१० ला अर्बन बँक बंद झाली. मात्र त्या अगोदरच १७ सप्टेंबरला १ लाख ४३ हजार, १९ सप्टेंबरला ५ हजार, २६ आणि २७ ला एक एक हजार काढले आहेत. आता त्यांच्या खात्यात १ हजार ९६५ रुपये आहेत. त्यामुळे रवि पाटीलांच्या माणसांना याबाबतची अगोदरच कूणकूण लागली होती. त्यामुळे यांचेच हात बँक बुडविण्यात असू शकते, असाही आरोप शिशिर धारकर यांनी यावेळी केला.

बँकेत माझ्या कुटुंबाचे 3 कोटी
बँकेत माझ्या कुटुंबाचे ३ कोटी ५९ लाख रुपये अडकले मग मला जर माहिती असती तर ते आम्ही अगोदरच काढले असते. मात्र पेणकरांना मी कदापीही फसविणार नाही. याउलट रवि पाटील जनतेची दिशाभूल करीत आहेत. नुकत्याच टाकलेल्या डांबर प्लान्टसाठी पैसे कमी पडत असल्याने त्यांनी पाटणेश्वर बॅकेच्या माध्यमातून १० जणांच्या नांवे 1 कोटी पैसे काढले आहेत. याचा तपास सहकार खात्याने करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

shishir dharkar
शिशिर धारकर पत्रकार परिषद

पेणचे पुणे करणार

तर सत्ताधाऱ्यांनी पेणला भकास केले असून आपण पेणचे पुणे करणार आहोत. शहरातील अंडरग्राऊंड गटारे, भूमिगत विद्युत लाईन, भाजी मार्केट यासह शहरात भरणारा बाजार या सर्व गोष्टींमध्ये हे सत्ताधारी पैसेच कमवत बसले आहेत. नगराध्यक्षांच्या स्वतःच्या बंगल्यात दिवसभर पाणी, मात्र पेणकरांना दिवसातून एक वेळच पाणी मिळते हा कुढला न्याय ? त्यामुळे पेणकरांच्या हितासाठी मी झटणार असून येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला बाजूला ठेवून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर रवि पाटील यांचा मुलगा यांनी सोशल नेटवर्कवर टाकले की बॅक बुडव्या शिशिर धारकरला भर नाक्यावर काळे फासणार. मात्र ज्याची बुध्दी तसा तो बोलणार पण अशा दादागिरीला व दडपशाही आपण घाबणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले‌. सदर पत्रकार परिषदेला ध्वजा गोरखा, भरत बडेला, संदिप मोने उपस्थित होते.

हेही वाचा - Ramdas Athavale Pune : तिसरी आघाडी झाली तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही - रामदास आठवले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.