ETV Bharat / state

शेकापकडून पनवेलमध्ये पुन्हा एकदा पैसे वाटप; कार्यकर्त्याला रंगेहात अटक - मावळ

लोकसभा निवडणुकीमध्ये पनवेल शहरात पैसे वाटपाची प्रकरणे चांगलीच गाजत आहेत. एका मतासाठी २०० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत भाव सुरू आहे. काल कामोठेत दोन शेकाप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना अटक केली होती. त्यानंतर, आज परत एकदा शेकापच्याच कार्यकर्त्याला अटक झाली आहे.

कार्यकर्त्याला रंगेहात अटक
author img

By

Published : Apr 28, 2019, 3:02 PM IST

Updated : Apr 28, 2019, 3:45 PM IST

रायगड - शेवटच्या टप्प्यातील प्रचार आचारसंहितेनुसार थांबला आहे. पण, राजकीय पक्षाकडून छुप्या रितीने याचे उल्लंघन केले जात आहे. एवढेच नव्हे तर पैशाची प्रलोभने देऊन मते विकत घेण्याचा प्रयत्न होत आहे. असाच प्रकार पनवेलमध्ये समोर आला आहे मतदारांना पैसे वाटप करताना शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. प्रताप आरेकर असे या कार्यकर्त्याचे नाव असून तो सुकापूर शहराचा सरचिटणीस आहे.

कार्यकर्त्याला रंगेहात अटक

लोकसभा निवडणुकीमध्ये पनवेल शहरात पैसे वाटपाची प्रकरणे चांगलीच गाजत आहेत. एका मतासाठी २०० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत भाव सुरू आहे. काल कामोठेत दोन शेकाप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना अटक केली होती. त्यानंतर, आज परत एकदा शेकापच्याच कार्यकर्त्याला अटक झाली आहे.

प्रताप आरेकरला अटक होताच त्याच्या सोबत असलेले कार्यकर्ते पळून गेले. आपण पकडलो गेलो आहोत हे समजताच आरेकरने पैशांची पिशवी बाजूच्या लाँड्रीत फेकून दिली. या पिशवीत एकूण २९ पाकिटे आढळून आली आहेत. प्रत्येक पाकिटात २२० रुपये सापडले. अशा गैरप्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Intro:बातमीला व्हिडीओ सोबत जोडला आहे. कृपया ब्रेकिंग टॅग लावावा.

पनवेल

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचारतोफा अखेर संपला असून गल्लोगल्ली, रस्त्यावर उतरून थेट मतदारांना साद घालण्यासाठी होणारा प्रचाराचा धूमधडाका थंडावला आहे. आता मतदाराना विविध विलोभने दाखवून आकर्षित करण्यासाठी छुपा प्रचार सुरू झालाय. काल कामोठेत शेकापच्या दोन कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना अटक केली असतानाच आज पुन्हा एकदा पनवेलच्या सुकापूर इथे आणखी एका शेकाप कार्यकर्त्याला पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडलं आहे. प्रकाश आरेकर असं या शेकाप कार्यकर्त्याच नाव असून तो शेकाप सुकापूर शहर सरचिटणीस आहे. Body:लोकसभा निवडणुकीमध्ये पनवेल शहरात पैसे वाटपाची प्रकरणं चांगलीच गाजत आहेत. पनवेलमध्ये पैशांचा पाऊस, मतदारांना पैसे, एका मतासाठी 200 रुपयांपासून ते 400 रुपयांपर्यंतचा भाव सुरु आहे. काल कामोठेत दोन शेकाप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना अटक केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा पनवेलच्या सुकापूर इथे शेकाप सुकापूर शहर सरचिटणीस प्रकाश आरेकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले. पैसे वाटप करताना आपण पकडले गेलो हे लक्षात आले असतानाच प्रकाश आरेकर यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते पळून गेले आणि प्रकाश आरेकर यांनी त्यांच्या हातात असलेली पैशांची पिशवी बाजूला असलेल्या श्री लाँड्री मध्ये फेकून दिली.Conclusion:या पिशवीत एकूण 29 पाकिटं आढळून आली असून प्रत्येक पाकिटात 200 रुपये ठेवले होते. प्रचार थंडावल्यानंतर काही शेकाप कार्यकर्त्यांकडून छुपा प्रचार सुरू असून पोलिसानी हा प्रयत्न हाणून पडला.
Last Updated : Apr 28, 2019, 3:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.