ETV Bharat / state

महिला दिन विशेष : मुंबई-पुणे महामार्गावर साठीलकर भगिनी अपघातग्रस्तांच्या वाली - mumbai pune highway

मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातग्रस्तांना मदतीसाठी साठीलकर भगिनी तत्पर आहेत. या भगीनींनी अपघातग्रस्तांच्या मदतीचे व्रत हाती घेतले आहे.

साठीलकर भगिनी
author img

By

Published : Mar 8, 2019, 12:54 PM IST

रायगड - मुंबई-पुणे महामार्गावर रोज कुठे ना कुठे अपघात होतात. या अपघातांमध्ये अनेकजण मृत्यूमुखी पडतात, तर काही जण गंभीर जखमी होतात. अशा वेळी अपघातस्थळी थांबण्याची व त्यांना मदत करण्याची तसदी शक्यतो कोणी घेत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा मदत मिळण्यास उशीर झाल्याने जखमी प्रवाशांचे मृत्यू होतात. परंतु, या महामार्गावरील अपघातग्रस्तांना मदतीसाठी साठीलकर भगिनी तत्पर आहेत. या भगीनींनी अपघातग्रस्तांच्या मदतीचे व्रत हाती घेतले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतने त्यांच्या कार्याचा घेतला हा धांडोळा.

साठीलकर भगिनी

जिल्ह्यातील खोपोली शहरात राहणाऱ्या पूजा व भक्ती ह्या श्रद्धा साठीलकर व गुरुनाथ साठीलकर यांच्या कन्या आहेत. या दोघीही बहिनी अभियांत्रिकी पदवीधारक आहेत. पूजा ही इंटेरियर डिझायनिंगचा व्यवसाय करते तर भक्ती इंजिनीयर होऊन एमबीएचे शिक्षण घेत आहे. उच्च शिक्षित असूनही या दोघीनी वडिलांचा आदर्श घेऊन अपघातग्रस्तांना मदतीचा वसा उचललेला आहे. त्यांचे वडील गुरुनाथ साठीलकर हे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली २० ते २५ वर्ष मुंबई-पुणे महामार्ग तसेच खालापुरमध्ये अपघातग्रस्तांना मदत करीत आहेत.

वडिलांचे हे मदतीचे कार्य पूजा व भक्ती लहानपणापासून पाहत आलेल्या आहेत. यातून प्रेरणा घेऊन दोघीही बहिणी वडिलांच्या खांद्याला खांदा लावून अपघातग्रस्तांची सेवा करीत आहेत. महामार्गावर रोज अपघात होत असतात. या अपघातांची माहिती संस्थेच्या व्हाटस ग्रुपवर आल्यानंतर पूजा व भक्ती आपल्या सहकाऱयांसोबत अपघातस्थळी मदतीसाठी धावून जातात. त्या जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करतात. औषधोपचार करून त्याचे नातेवाईक येईपर्यंत त्यांची काळजी घेतात.

या सेवेमधून कोणताही आर्थिक फायदा मिळत नसला तरी कोणाचा तरी जीव वाचत असल्याने मानसिक समाधान मिळत असल्याचे पूजा व भक्ती सांगतात. या कार्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी त्यांचा सत्कार केलेला आहे. तसेच अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांची मदत करा असे, आवाहनही दोघी बहिणी सर्वांना करतात.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने साठीलकर बहिणींचे काम अनेकांना स्फूर्ती देणारी आहे. इतर क्षेत्रात काम करताना फक्त आर्थिक फायदा पाहिला जातो. मात्र, अपघातग्रस्तांना मदतीचा हात पुढे करताना आर्थिक फायदा न पाहता माणुसकीच्या नात्याने केली जाणारी त्यांची सेवा निश्चितच प्रेरणादायी आहे.

Intro:जागतिक महिला दिनानिमित्त खास मुलाखत

साठीलकर भगिनी अपघातग्रस्तांच्या वाली

उच्चशिक्षित असूनही मदतीतून करीत आहेत अपघातग्रस्तांची सेवा

रायगड : मुंबई पुणे महामार्गावर वाहनांचे अपघात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. या अपघातात काहीजण मृत्युमुखी होतात, तर काही जण गंभीर जखमी होऊन महामार्गावर पडलेले असतात. अशा वेळी अपघात ठिकाणी थांबण्याची व त्यांना मदत करण्याची तसदी शक्यता कोण घेताना दिसत नाही. त्यामुळे अपघातग्रस्तांच्या मदतीला पोलीस आल्यानंतर त्यांना मदत मिळाली जाते. अपघातग्रस्तांना मदतीसाठी तत्पर असलेल्या साठीलकर भगिनी ह्या अपघातग्रस्तांची मदतनीस म्हणून काम करीत असून या क्षेत्रात दोघीनीही मदतीचे व्रत हातात घेतले आहे. जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने त्याची घेतलेली खास मुलाखत

Body:जिल्ह्यातील खोपोली शहरात राहणाऱ्या पूजा व भक्ती ह्या श्रद्धा साठीलकर व गुरुनाथ साठीलकर यांच्या कन्या. दोघीही बीई सिव्हिल इंजिनीयर पदवीधारक आहेत. पूजा ही इंटेरियर व्यवसाय करीत असून भक्तीही इंजिनीयर होऊन एमबीएचे शिक्षण घेत आहे. उच्च शिक्षित असूनही या दोघीनी वडिलांचा आदर्श घेऊन अपघातग्रस्तांना मदतीचा वसा उचललेला आहे. वडील गुरुनाथ साठीलकर हे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली 20 ते 25 वर्ष मुंबई पुणे महामार्ग तसेच खलापुरामध्ये होत असलेल्या अपघातग्रस्तांना मदत करीत आहेत.

Conclusion:वडिलांचे हे मदतीचे कार्य पूजा व भक्ती लहान पणापासून पाहत आलेल्या आहेत. यातून प्रेरणा घेऊन दोघीही बहिणी या कार्यात वडिलांच्या खांद्याला खांदा लावून अपघातग्रस्तांची सेवा करीत आहेत. महामार्गावर रोज अपघात होत असतात. अपघाताची माहिती संस्थेच्या व्हाटस ग्रुपवर आल्यानंतर पूजा व भक्ती आपल्या सहकार्यासोबत अपघातस्थळी जाऊन अपघातग्रस्तांना मदतीसाठी धावून जातात.
वाहनाच्या अपघातात अनेक जण मृत्युमुखी होतात तर काही गंभीर जखमी होतात. त्यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पूजा व भक्ती घटनास्थळी जाऊन जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करतात. त्यांना औषधोपचार करून त्याचे नातेवाईक येईपर्यत आपली जबाबदारी पार पाडीत असतात.
या सेवेमधून कोणताही आर्थिक फायदा मिळत नसला तरी मानसिक समाधान तसेच त्याचे प्राण वाचविल्याचे समाधान मिळत असल्याचे पूजा व भक्ती याचे म्हणणे आहे. त्याच्या या सेवेसाठी त्यांना अनेक सामाजिक संस्थांनी सत्कार केलेला आहे. तसेच अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांची मदत करा असे आवाहनही दोघी बहिणींनी यानिमित्ताने केले आहे.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने साठीलकर बहिणी याच्या या सेवेबाबत त्याच्याशी केलेली बातचीत ही अनेकांना स्फूर्ती देणारी आहे. इतर क्षेत्रात काम करताना आर्थिक फायदा हा बघितला जातो. मात्र अपघातग्रस्तांना मदतीचा हात पुढे करताना असे कोणतही आर्थिक फायदा मिळत नसला तरी सेवेचा फायदा हा पैशापेक्षा मोठा असल्याचे जिवंत उदाहरण साठीलकर बहिणींना मिळत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.