रायगड - कोरोना हा भयानक विषाणू सध्या जगभर झपाट्याने पसरत आहे. शासन आणि प्रशासन वारंवार जनतेला आपली काळजी घेण्यासाठी पोटतिडकीने आवाहन करत आहे. मात्र, जनता अजूनही या विषाणूबाबत गंभीर नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, दिघी येथील चौथीत शिकणारी संस्कृती राजकुमार कोलथरकर हिने कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी एक गीत तयार केले आहे.
संस्कृतीने सैराट सिनेमातील झिंग झिंग झिंगाट या गाण्याच्या चालीवर कोरोना जंनगृतीबाबत एक गीत तयार केले आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऐका संस्कृतीने तयार केलेले हे भन्नाट गीत.
हेही वाचा- अलिबागमध्ये मोकाट फिरणाऱ्या 'होम क्वारंटाईन' व्यक्तीवर गुन्हा दाखल