ETV Bharat / state

'ज्यांच्या बापजाद्यांनी ब्रिटिशांचे पाय चाटले ते आमच्याकडे नागरिकत्वाचा पुरावा मागतायेत'

ज्यांच्या बापजाद्यांनी ब्रिटिशांची चाकरी केली त्यांचे पाय चाटले, ते आता आपल्याकडे नागरिकत्वाचा पुरावा मागत आहेत, अशा शब्दात सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला.

सचिन सावंत - काँग्रेस प्रवक्ते
सचिन सावंत - काँग्रेस प्रवक्ते
author img

By

Published : Jan 4, 2020, 4:09 PM IST

Updated : Jan 4, 2020, 5:13 PM IST

रायगड - खोपोलीत आज संविधान समर्थक मंचच्या वतीने CAA व NCR च्या विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास 7 ते 8 हजार पुरुष महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. तर भाजप सोडून सर्वच पक्षाचे पदाधिकारीही या मोर्चात सामिल झाले होते. तर सर्वाना मार्गदर्शन करण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत हेही उपस्थित होते.

सचिन सावंत- काँग्रेस प्रवक्ते

ज्यांच्या बापजाद्यांनी ब्रिटिशांची चाकरी केली त्यांचे पाय चाटले, ते आता आपल्याकडे नागरिकत्वाचा पुरावा मागत आहेत, अशा शब्दात सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला.

शनिवारी दुपारी 11 वाजता शहरातील शीळफाटा येथून हा मोर्चा खोपोलीच्या मुख्य बाजारपेठ रोड वरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आला. या ठिकाणी एक छोटेखानी सभा पार पडली. या सभेला सचिन सावंत यांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांनी मोदी शाह यांच्यावर निशाणा साधला.

पंतप्रधान मोदी व अमित शाह कसे खोटे बोलतात आणि आपल्याला कसे फसवत आहेत यावर सावंत यांनी आपले मत व्यक्त केले. यासोबतच या दोघांच्या धोरणांवर घनाघाती आरोपही केले. या मोर्चात शहरातील जवळपास सात ते आठ हजार लोकांनी सहभाग घेतला होता. त्यात महिला आणि मुस्लीम समाज बांधवांची उपस्थिती लाक्षणीय होती. मोर्चा अगदी शांतातेत पार पडला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचाही यावेळी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

Intro:ज्यांच्या बापजादयानी ब्रिटिशांचे पाय चाटले ते आमच्या कड़े नागरिकत्वाचा पुरावा मागतायत - कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा मोदी शाह वर हल्ला बोल
रायगड - खोपोलीत आज संविधान समर्थक मंच च्या वतीने CAA व NCR च्या विरोधात भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते,जवळपास 7 ते 8 हजार पुरुष महिला या मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या तर भाजपा सोडून सर्वच पक्षाचे पदाधिकारी ही सामिल झाले होते.तर सर्वाना मार्गदर्शन करण्यासाठी कॉंग्रेस चे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत हे ही उपस्तित होते. ज्यांच्या बापजादयांनी ब्रिटीशांची चाकरी केली त्यांचे पाय चाटले ते आता आपल्या कड़े नागरिकत्वाचा पुरावा मागत आहेत अश्या शब्दात सचिन सावंत यांनी मोदी व शाह वर हल्ला बोल केला.Body:दुपारी 11 वाजता शहरातील शीलफाटा येथून हा मोर्च्या खोपोलीच्या मुख्य बाजारपेठ रोड वरुन डॉ बाबासाहेब अंबेडकर चौकात आला व तेथे एक छोटेखानी सभा पार पडली व या सभेला सचिन सावंत यांनी संबोधित केले, पंतप्रधान मोदी व अमित शाह कसे खोटे बोलतात व आपल्याला फसवत आहेत या वर त्यांनी आपली मते मांडली व घनाघाति आरोप ही केले, Conclusion:या मोर्च्यात शहरातील जवळपास सात ते आठ हजार लोकांनी सहभाग घेतला होता त्यात महिला व मुस्लिम समाज बाँधवांची उपस्तिति लाक्षणीय होती. तर भाजपा सोडून सर्वच पक्षाचे नेते व कार्यकर्ते ही सामिल झालेले दिसले. मोर्च्या अगदी शांतातेत पार पडला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा ही चोख बंदोबस्त पहावयास मिळाला.
Last Updated : Jan 4, 2020, 5:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.