ETV Bharat / state

खालापूर : महाडच्या जिल्हा परिषदेत शाळेत चोरी; आरोपींना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी - mahad zp school khalapur robbery news

महड येथे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत विद्यार्थांना शिकविण्यासाठी प्रोजेक्टर, सीपीयु, मॉनिटर आणि प्रिंटर हे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच विद्यार्थांना पोषण आहार देण्यासाठी ताटे (19), बादल्या (1), ग्लास (45), टाकी, पातेले आदी. साहित्य ही शाळेच्या रूममध्ये ठेवण्यात आले होते.

Mahad zp school
महाड जि प शाळा
author img

By

Published : May 25, 2021, 5:08 PM IST

खालापूर (रायगड) - तालुक्यातील महड येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत विद्यार्थाना शिक्षणाचे धडे गिरवता यावेत म्हणून डिजिटल शाळा करण्यात आली होती. याठिकाणी डिजिटल साहित्य व पोषण आहारासाठी असणारी भांडी व अन्य साहित्याची चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून येथील सर्व सामान चोरून नेल्याचे समोर आल्याने येथील शिक्षकांंनी याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर या प्रकरणाचा वेगवान तपास करत पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली. या दोघांनाही तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

arrested accused
अटक करण्यात आलेले आरोपी

शाळेतील डिजिटल साहित्यासह इतर साहित्याची चोरी -

महड येथे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत विद्यार्थांना शिकविण्यासाठी प्रोजेक्टर, सीपीयु, मॉनिटर आणि प्रिंटर हे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच विद्यार्थांना पोषण आहार देण्यासाठी ताटे (19), बादल्या (1), ग्लास (45), टाकी, पातेले आदी. साहित्य ही शाळेच्या रूममध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, कोरोनाकाळात शाळा बंद असल्यामुळे शिक्षक अधूनमधून येत असतात. नुकताच दोन दिवसांपूर्वी चक्रीवादळ आल्याने शाळेचे काही नुकसान झाले की नाही यांच्या पाहणीसाठी येथील मुख्याध्यापिका अनिता चव्हाण व सहशिक्षिका जयश्री सुर्वे या शाळेत आल्या असता शाळेचा कडीकोंडा तोडलेल्या अवस्थेत दिसून आला. आत प्रवेश करून पाहिले असता डिजिटल शाळेचे साहित्यासह पोषण आहाराची भांडीही चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर याबाबत मुख्याध्यापिका अनिता चव्हाण यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

हेही वाचा - 'बाजार बंद करा' म्हणताच, फळ विक्रेत्यांनी केला पोलिसांवर हल्ला, डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न

आरोपींना न्यायालयीन कोठडी -

उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला व पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांनी या प्रकरणाचा तपास केला. लव्हे यांच्या पथकाने महड गावात वास्तव्यात असणारे मंगेश कुमार उर्फ शेंडी (वय-21), राजेशकुमार राम (वय -21) या दोघांना 22 मेला अटक केली. यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे शाळेच्या चोरी झालेल्या साहित्यासह इतर सामानही आढळून आले. या दोघांना खालापूर न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांनी महड गावात केलेल्या अनेक चोरीच्या घटनाही उघड झाल्या आहेत. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईनंतर शाळेने पोलिसांचे आभार मानले.

हेही वाचा - अमरावतीत एकाच कुटुंबातील २ सख्ख्या भावांसह तिघांचा कोरोनाने मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.