ETV Bharat / state

खंडाळा घाटात कार आणि टेम्पोचा अपघात; दोघे जखमी

मुंबई-पुणे महामार्ग क्रमांक 4 वर पुण्याहून मुंबईकड़े जात असलेल्या टेम्पो चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने तो समोरून जाणाऱ्या कारला जाऊन धडकला. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.

mumbai pune express way
khandala ghat
author img

By

Published : Dec 8, 2019, 12:44 PM IST

रायगड- मुंबई-पुणे महामार्गावरील खंडाळा घाटात आज सकाळी भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईकड़े जात असलेल्या टेम्पो चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने तो समोरून जाणाऱ्या कारला जाऊन धडकला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून दोघे जखमी झाले आहेत.

खंडाळा घाटातील कार आणि टेम्पोच्या अपघातानंतरचे दृश्य

मुंबई-पुणे महामार्ग क्रमांक 4 वर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत असून दिवसागणिक एक अपघात होत आहे. आज झालेल्या अपघातातील टेम्पोचे अमृतांजन पुलाखालून मुंबईच्या दिशेने बोराघाट उतरताना ब्रेक निकामी झाले. त्यामुळे त्याचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने वळणावर तो पलटी झाला. त्यानंतर टेम्पोच्या पुढे जात असलेली एक कार त्या टेम्पोखाली दाबली गेली. त्या कारमधील दोन्ही प्रवासी जखमी झाले असून यात जीवितहानी मात्र टळली आहे.

घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या सहाय्याने टेम्पो बाजूला करून जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यावर ट्राफिक खुले करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Intro:खंडाला घटात अपघात कार वर टेम्पो पलटी, कार मधील दोन जण जखमी
रायगड - मुंबई पुणे हाय वे वर खंडाला घाटात आज सकाळी एक भीषण अपघात झाला, पुण्याकडून मुंबई कड़े येत असलेला एक टेम्पो भरधाव वेगात एका कार वर पलटी झाला,कार मधील प्रवाशयांचे दैव बल्लतर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु दोन जण जखमी झाले असल्याचे समजते, टेम्पो चे ब्रेक निकामी होऊन हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.Body:मुंबई पुणे महामार्ग क्रमांक 4 वर अपघाताचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत असून दिवसागनिक रोज एक अपघात होत आहे आणि बहुतांश अपघात हे वाहनाचे ब्रेक निकामी होऊन होत आहेत असे समोर आले आहे,आज ही असाच अपघात झालय एक आयशर टेम्पो अमृतांजन पुलाखालून मुंबई च्या दिशेने बोराघाट उतरते वेळी त्याचे ब्रेक निकामी झाले व त्याचे वेगावरिल नियंत्रण सुटले आणि एक वळणावर तो पलटी झाला त्यावेळेस पुढे जात असलेली एक कार त्या टेम्पो खाली दबली गेली सुदैवाने त्या कार मधे दोन प्रवासी होते व त्यांना फक्त मार लागलाConclusion:घटनेची माहितीं मिलताच खोपोली पोलिस घटनास्थली पोहचले क्रेन च्या सहायाने टेम्पो बाजूला करून जखमीना उपचारासाठी हलवन्यात आले असून ट्राफिक खुले करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले,
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.