ETV Bharat / state

अवकाळी पावसाने रायगडमधील 582 गावे बाधित; भात शेतीचे मोठे नुकसान

author img

By

Published : Nov 1, 2019, 7:02 PM IST

नोव्हेंबर महिना सुरू झाला असून पावसाचे सावट कमी झालेले नाही. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील बहरलेल्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. बहरलेल्या उभ्या आणि कापलेल्या पिकाला कोंब आल्याने हाताशी आलेली पिके गमवावी लागली आहेत.

भात शेतीचे मोठे नुकसान

रायगड - मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस आणि त्यामुळे बहरलेली भात शेती शेतकऱ्यांना सुखद करणारी होती. मात्र, परतीच्या अवकाळी पावसाने बहरलेल्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. भात शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर कृषी विभागाकडून पंचनामे सुरू झाले आहेत. जिल्ह्यात 582 गावे बाधित झाली आहेत. 5 हजार 864.90 हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून आतापर्यंत 2 हजार 993 हेक्टर शेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. अद्याप 2 हजार 871.90 हेक्टर भातशेतीचे पंचनामे बाकी आहेत.

हेही वाचा- देशाच्या उत्पादन क्षेत्रात मंदावली हालचाल; गेल्या दोन वर्षात 'पीएमआय'ने नोंदविला निचांक

नोव्हेंबर महिना सुरू झाला असून पावसाचे सावट कमी झालेले नाही. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील बहरलेल्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. बहरलेल्या उभ्या आणि कापलेल्या पिकाला कोंब आल्याने हाताशी आलेली पिके गमवावी लागली आहेत. नैसर्गिक पावसाच्या आपत्तीने शेतकरी हवालदिल झाला आहे.

हेही वाचा- 'भाजपला सरकार स्थापन करता आले नाही तर, पर्यायी सरकार स्थापन करू'

शेतकऱ्याच्या भातशेती आणि पिकाचे नुकसान झाले तरी शासन दरबारी शेतकऱ्याची दखल घेण्यास उशिर झाला. कृषी विभागाकडून भात शेतीचे पंचनामे सुरू झाले. मात्र, शेतकऱ्यांनी शेतीत केलेला खर्चही निघेल का नाही? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यातच भात पिकाला कोंब आल्याने पुढल्या वर्षी भात शेती कशी करायची? हा प्रश्नही त्यांना सतावत आहे. शेतीच्या झालेल्या नुकसानीची लवकरात लवकर भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. जिल्ह्यात अलिबाग 32, पेण 61, मुरुड 28, खालापूर 15, कर्जत 22, पनवेल 12, उरण 30, माणगाव 28, तळा 28, रोहा 35, पाली 75, महाड 20, पोलादपूर 26, म्हसळा 43, श्रीवर्धन 75 अशी एकूण 582 गावे अवेळी पावसाने बाधित झाली आहेत. जिल्हा कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अलिबाग 650, पेण 362.50, मुरुड 610, खालापूर 136.41, कर्जत 180, पनवेल 52.65, उरण 315, माणगाव 1100, तळा 250, रोहा 950, पाली 320, महाड 120, पोलादपूर 400, म्हसळा 235, श्रीवर्धन 183.34 असे एकूण 5 हजार 864.90 हेक्टर भात क्षेत्र बाधित झाले आहे.

Intro:अवेळी पावसाने जिल्ह्यातील 582 गावे बाधित तर 5864.99 हेक्टर भात शेतीचे नुकसान

2993 हेक्टर शेतीचे पंचनामे झाले 2871.90 हेक्टर भातशेतीचे पंचनामे अद्यापही बाकी

रायगड : उत्तम पडलेला पाऊस आणि त्यामुळे बहरलेली भात शेती शेतकऱ्यांना सुखद करणारी होती. मात्र परतीच्या अवेळी पावसाने बहरलेली भातशेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचे डोळे पाणावले गेले. भात शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर कृषी विभागाकडून पंचनामे सुरू झाले. जिल्ह्यात 582 गावे बाधित झाली असून 5864.90 हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून आतापर्यंत 2993 हेक्टर शेतीचे पंचनामे झाले असून अद्याप 2871.90 हेक्टर भातशेतीचे पंचनामे बाकी आहेत.

नोव्हेंबर महिना सुरू झाला असून पावसाचे सावट कमी झालेले नाही. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील बहरलेल्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. बहरलेली उभ्या आणि कापलेल्या पिकाला कोंब आल्याने हाताशी आलेली पिके गमवावी लागली आहेत. आधीच जिल्ह्यातील भाताचे कोठार असलेली शेती कमी झाल्याने त्यात नैसर्गिक पावसाच्या आपत्तीने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Body:शेतकऱ्याच्या भातशेती आणि पिकाचे नुकसान झाले तरी शासन दरबारी जिल्ह्यातील शेतकऱ्याची दाखल घेण्यास उशीर झाला. कृषी विभागाकडून भात शेतीचे पंचनामे सुरू झाले असले तरी शेतकऱ्यांनी शेतीत केलेला खर्च सुटेल की नाही हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यातच भात पीकाला कोंब आल्याने पुढल्या वर्षी भात शेती कशी करायची हा प्रश्नही त्यांना सतावत आहे. शेतीच्या झालेल्या नुकसानीची लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.Conclusion:जिल्ह्यात अलिबाग 32, पेण 61, मुरुड 28, खालापूर 15, कर्जत 22, पनवेल 12, उरण 30, माणगाव 28, तळा 28, रोहा 35, पाली 75, महाड 20, पोलादपूर 26, म्हसळा 43, श्रीवर्धन 75 अशी एकूण 582 गावे अवेळी पावसाने बाधित झाली आहेत. जिल्हा कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अलिबाग 650, पेण 362.50, मुरुड 610, खालापूर 136.41, कर्जत 180, पनवेल 52.65, उरण 315, माणगाव 1100, तळा 250, रोहा 950, पाली 320, महाड 120, पोलादपूर 400, म्हसळा 235, श्रीवर्धन 183.34 असे एकूण 5864.90 हेक्टर भात क्षेत्र बाधित झाले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.