ETV Bharat / state

महाड विधानसभा आढावा: पुन्हा रंगणार गोगावले विरुद्ध जगताप सामना - रायगड

महाड विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. शिवसेनेच्यानंतर माणिकराव जगताप यांना मानणारा म्हणजे काँग्रेस विचारसरणीच्या मतदारांचा नंबर लागतो. भाजपा, शेकाप व इतर राजकिय पक्षांची या मतदारसंघातील ताकद कमी असली तरी प्रविण दरेकर, जयवंत दळवी, बिपीन म्हामुणकर यांसारखे मुत्सद्दी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपची ताकद निर्णायक ठरणार आहे.

महाड विधानसभा आढावा: पुन्हा रंगणार गोगावले विरुद्ध जगताप सामना
author img

By

Published : Sep 30, 2019, 1:25 PM IST

Updated : Oct 2, 2019, 12:04 PM IST

रायगड - जिल्ह्याच्या टोकाला असलेला महाड विधानसभा मतदारसंघ हा तसा विरोधी विचारसरणीचा मतदारसंघ आहे. क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहीत, दलित मित्र सुरभानाना टिपणीस, लोकनेते शांतारामभाऊ फिलसे यांच्यासारख्या मातब्बरांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. भौगोलिकदृष्ट्या दुर्गम अशा या मतदारसंघात महाड आणि पोलादपूर तालुक्यांसह माणगाव तालुक्यातील दोन जिल्हा परीषद गटांचा समावेश आहे. २००४ च्या विधानसभेत राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या माणिकराव जगताप यांचा अपवाद वगळता महाड विधानसभा मतदारसंघातून नेहमी काँग्रेस विरोधी विचारसरणीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

महाड विधानसभा आढावा: पुन्हा रंगणार गोगावले विरुद्ध जगताप सामना
महाड विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. शिवसेनेच्यानंतर माणिकराव जगताप यांना मानणारा म्हणजे काँग्रेस विचारसरणीच्या मतदारांचा नंबर लागतो. भाजपा, शेकाप व इतर राजकीय पक्षांची या मतदारसंघातील ताकद कमी असली तरी प्रविण दरेकर, जयवंत दळवी, बिपीन म्हामुणकर यांसारखे मुत्सद्दी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपची ताकद निर्णायक ठरणार आहे. मनसेची ताकद या मतदारसंघात नसली तरी राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्यातील ही लढत चुरशीची होणार यामध्ये काही शंका नाही.

लोकसभा निवडणुकीत आघाडीने युतीला याठिकाणी फक्त सात हजारांची आघाडी दिली होती. 2014 मध्ये याच मतदारसंघातून गीतेंना 16 हजारांचे मताधिक्य मिळवून दिले होते. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भरत गोगावलेंना माणिक जगताप टक्कर देऊ शकतात. मात्र, गोगावले यांचा गावागावात असलेला जनसंपर्क हा त्यांची जमेची बाजू आहे.

महाड विधानसभा मतदारसंघात नागरी समस्या कमी नाहीत. बेरोजगारी, शाळा आणि रस्त्यांची दुरवस्था, पाणीप्रश्न, आरोग्य आणि प्रदुषण या सर्वच समस्या या मतदारसंघ आहेत. येथील राजकारण हे नागरी समस्यांऐवजी भावनीक मुद्दयांवर चालत आले आहे. आता पुन्हा शिवसेनेचे भरत गोगावले आणि काँग्रेसचे माणिकराव जगताप यांनी आपले राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी दंड थोपटले आहेत. आरोप प्रत्यारोपाच्या कलगीतुरऱ्यात महाडचा आमदार कोण होणार, हे आता मतदारराजाच ठरवेल.

Intro:महाड विधानसभा आढावा

महाड मध्ये पुन्हा रंगणार गोगावले विरुद्ध जगताप सामना

माणिक जगताप यावेळी शिवसेनेला शह देणार की भगवा कायम राहणार

रायगड : जिल्ह्याच्या टोकाला असलेला महाड विधानसभा मतदारसंघ हा तसा विरोधी विचारसरणीचा मतदारसंघ आहे. क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहीत, दलित मित्र सुरभानाना टिपणीस, लोकनेते शांतारामभाऊ फिलसे यांच्यासारख्या मातब्बरांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. भौगोलीकदृष्ट्या दुर्गम अशा या मतदारसंघात महाड आणि पोलादपुर हे दोन तालुक्यांसह माणगाव तालुक्यातील दोन जिल्हा परीषद मतदारसंघांचा समावेश होतो. २००४ मधील विधानसभेत राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडुन आलेल्या माणिकराव जगताप यांचा अपवाद वगळता महाड विधानसभा मतदारसंघातुन नेहमी काँग्रेस विरोधी विचारसरणीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

आज महाड विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. शिवसेनेच्यानंतर माणिकराव जगताप यांना मानणारा म्हणजे काँग्रेस विचारसरणीच्या मतदारांचा नंबर लागतो. भाजपा, शेकाप व इतर राजकिय पक्ष या मतदारसंघात यापुर्वी ताकदीने कमी असले तरी प्रविण दरेकर, जयवंत दळवी, बिपीन म्हामुणकर यांसारखे मुत्सद्दी शिवसेनला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये दाखल झाल्याने या विधानसभा निवडणुकीत भाजपची ताकद निर्णायक राहणार आहे. मनसेचची उल्लेखनिय ताकद या मतदारसंघात नसली तरी राज ठाकरे यांना मानणारा, विचाराने प्रेरीत होणारा एक मोठा वर्ग या मतदारसंघात असला तरी येथील निवडणुक हि शिवसेनेचे विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्यामध्ये होणार असुन हि लढात चुरशिची होणार यामध्ये काही शंका नाही.Body:2019 च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीने युतीला याठिकाणी फक्त सात हजाराची आघाडी दिली आहे. 2014 मध्ये याच मतदारसंघातून गीतेने सोळा हजारांचे मताधिक्य मिळवून दिले होते. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भरत गोगावले यांना याचा काही प्रमाणात माणिक जगताप फटका देऊ शकतात. मात्र गोगावले यांचा गावागावात असलेला जनसंपर्क हा त्याची जमेची बाजू आहे. Conclusion:इतर मतदारसंघांप्रमाणे या महाड विधानसभा मतदारसंघात नागरी समस्यांची काही कमी नाही. बेरोजगारी, शाळागृह आणि रस्त्यांची दुरवस्था, पाणीप्रश्न, आरोग्य आणि प्रदुषण या सर्वच समस्या या मतदारसंघ आहेत. येथील राजकारण हे नागरी समस्याऐवजी भावनीक मुद्दयांवर चालत आले आहे. आता पुन्हा शिवसेनेचे भरत गोगावले आणि काँग्रेसचे माणिकराव जगताप यांनी आपले राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी दंड थोपटले आहेत. आरोप प्रत्यारोपाच्या कलगीतुरऱ्यात महाडचा आमदार कोण होणार हे आता मतदारराजाच ठरविल.
Last Updated : Oct 2, 2019, 12:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.