ETV Bharat / state

रायगडातील लॉकडाऊन पुन्हा झाले सैल, जिल्हाधिकाऱ्यांनी काढला नवीन अध्यादेश

जिल्ह्यात कोरोना प्रादूर्भावाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 11 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, आता यात शिथिलता देत किराणा सामान, चिकन, मटण, अंडी, भाजीपाला, मासे ही दुकाने 24 जुलैपासून सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत उघडी ठेवण्याचा नवीन अध्यदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आज काढला आहे.

रायगडातील लॉकडाऊन पुन्हा झाले सैल
रायगडातील लॉकडाऊन पुन्हा झाले सैल
author img

By

Published : Jul 23, 2020, 7:57 PM IST

रायगड : जिल्ह्यात 15 जुलै ते 26 जुलै दरम्यान लॉकडाऊन सुरू आहे. अकरा दिवसाच्या या लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकारी यांनी पुन्हा दुसऱ्यांदा जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानाच्या वेळेत शिथिलता दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक क्षेत्रातील किराणा सामान, चिकन, मटण, अंडी, भाजीपाला, मासे ही दुकाने 24 जुलैपासून सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचा नवीन अध्यदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज(गुरुवार) काढला आहे. त्याचबरोबर जॉगिंग, एकट्याने करायचे व्यायाम, सायकलिंग यांनाही सकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे.

जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना प्रादूर्भावाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अकरा दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले होते. 15 जुलै ते 26 जुलै काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने पूर्ण बंद राहणार होती. मात्र, किराणा सामान, चिकन, मटण विक्रेत्यांनी दुकाने सुरू करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी 19 जुलैपासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 6 ते 11 या वेळेत उघडण्याची परवानगी देऊन लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली होती. मात्र, दुकानदारांसह नागरिकांनी दिलेली वेळ वाढवून देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यानुसार पुन्हा जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे. किराणा सामान, अंडी, फळे, भाजीपाला, चिकन, मटण, मासे दुकाने सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यत खुले राहणार आहेत. तर सार्वजनिक खुल्या जागेत वैयक्तिक शारीरिक व्यायाम, सायकलिंग, जॉगिंग, रनिंगसाठीही परवानगी देण्यात आलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.