ETV Bharat / state

रायगड : विळे भागाडमधून कोट्यवधींचे रक्तचंदन जप्त - जप्त

जिल्ह्यात माणगाव तालुक्यामध्ये कोट्यवधींचे रक्तचंदन गोडावून ठेवण्यात आल्याची किंचितही कुणकुण वन विभागाला नाही. मुबंई गुप्तचर विभागाचे पथक येऊन कारवाई करतात आणि वन विभाग मात्र सुस्त असल्याचे या कारवाईने दिसत आहे.

रक्तचंदन
author img

By

Published : Mar 10, 2019, 5:02 AM IST

रायगड - माणगाव जवळील विळे भागाड एमआयडीसीत रक्‍तचंदनाचा साठा मुंबई गुप्तचर विभागाने हस्तगत केला. ३ हजार ७२२ किलो वजनाचे १३१ सोलीव नग असे एकूण २ हजार ४९७ घन मिटर असलेले सुमारे १ कोटी ८६ लाख रुपयांचा रक्तचंदन या कारवाईमध्ये हस्तगत करण्यात आले. जिल्ह्यात एवढी मोठी रक्तचंदन जप्त करण्याची कारवाई पहिल्यांदाच झाली असून याबाबत गुप्तता पाळण्यात आलेली होती.

माणगाव तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक वसाहतीमध्ये डी ८० क्रमांकाच्या प्लॉटमध्ये गोडावून आहे. या गोडाऊनमध्ये रक्तचंदनाचा साठा असल्याची माहिती मुंबई गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानुसार मुंबई गुप्तचर विभागाने ८ मार्चला दुपारी गोडाऊनवर धाड टाकली. यावेळी याठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तचंदन साठा असल्याचे निर्दशनात आले. त्यानंतर हा करोडोचा रक्तचंदनाचा साठा जप्त केला असून माणगाव वन विभागाकडे जप्त केलेला माल देण्यात आलेला आहे.

मुंबई गुप्तचर विभागाने केलेली कारवाई बाबत पूर्णतः गुप्तता पाळण्यात आली होती. त्यामुळे या कारवाईची माहिती वन विभागालाही नव्हती. जिल्ह्यात एवढी मोठी रक्तचंदनाची कारवाई झाली असल्याने यामागे रक्तचंदन तस्करी करणारे बडे हात कोणाचे आहेत. याबाबत कोणतीही माहिती कळलेली नाही. तसेच कोणालाही अटक करण्यात आलेले नसून गोडावून सील करण्यात आलेले आहे.

Intro:Body:

जिल्ह्यात माणगाव तालुक्यामध्ये कोट्यवधींचे रक्तचंदन गोडावून ठेवण्यात आल्याची किंचितही कुणकुण वन विभागाला नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. मुबंई गुप्तचर विभागाचे पथक येऊन एवढी मोठी कारवाई करतात आणि वन विभाग मात्र सुस्त झोपलेले असल्याचे या कारवाईने दिसत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.