ETV Bharat / state

नवीन वर्षा निमित्ताने फिरायला आलेल्या तरुणीवर बलात्कार - panvel crime news

पनवेलमध्ये एका नराधमाने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून याप्रकरणी पनवेल पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

rape of  young girl who came to mumbai on occasion of new Year
नवीन वर्षा निमित्ताने मुंबई फिरायला आलेल्या तरुणीवर बलात्कार
author img

By

Published : Dec 29, 2020, 5:03 PM IST

पनवेल (रायगड) - नाताळ व नवी वर्षानिमित्त मुंबई फिरायला आलेल्या तरुणीवर पनवेलमध्ये एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी पनवेल पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. शिवा उर्फ सचिन शर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्तांची प्रतिक्रिया

वडघर येथील झाडीत नेऊन केला बलात्कार -

पीडित तरुणी झारखंड येथील जसपूर जिल्ह्यातील रहिवासी असून, ती तेथून प्रथम दिल्ली येथे आली. तेथे एक दिवस हॉटेलमध्ये राहून 22 डिसेंबर रोजी रेल्वेने बांद्रा येथे आली. या तरूणीला एकटी असल्याचे पाहून टीसीने चाइल्ड हेल्प लाईनच्या ताब्यात दिले. चाइल्ड हेल्प लाईनच्या पदाधिकाऱ्यांनी तिला सखी सेंटर येथे दाखल केले. तसेच तिची अधिक चौकशी करत तिला सोडून दिले. तेथून ती पनवेल येथे आली. पनवेलमध्ये तिची ओळख शिवा नावाच्या व्यक्तीशी झाली 27 डिसेंबरला शिवाने वडघर येथील झाडीत नेऊन चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. तसेच तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी शिवा उर्फ सचिन शर्मा या रिक्षाचालकाला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादी नगरसेवकाच्या खुनाची सुपारी, येरवड्यात रचला कट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.