रायगड - जिल्ह्यात आज (दि. १ जून) पहाटेपासून रिमझिम पावसाने विजांच्या कडकडाटासह सुरुवात केली आहे. त्यामुळे उन्हाच्या उकाड्याने हैराण झालेले रायगडकर पावसाच्या आगमनाने सुखावले आहेत. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर मातीचा सुगंध सुटल्याने वातावरण प्रफुल्लित झाले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम समुद्र किनारपट्टीवर वादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून पावसाची शक्यता व्यक्त केली होती. जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची रिमझिम सुरु होती. त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते हे पावसाच्या पाण्याने भिजले असून मातीला सुगंध सुटला आहे. पावसामुळे काहीअंशी उकाडा कमी झाल्याने रायगडकर सुखावले आहेत. मात्र, अचानक आलेल्या पावसाने रायगडकरांची काही प्रमाणात तारांबळ झाली आहे.
हेही वाचा - अरबी समुद्रात वादळाची शक्यता, मासेमारी करण्यास चार जूनपर्यंत बंदी