ETV Bharat / state

रायगडात निकालाचा टक्का घसरला; दहावीचा निकाल 76.78 टक्के, निकालात मुलींनी मारली बाजी

दहावीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्याचा निकाल 76.78 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात 13 टक्क्यांची घट झाली आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

रायगडात निकालाचा टक्का घसरला
author img

By

Published : Jun 9, 2019, 12:08 PM IST

रायगड - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्याचा निकाल 76.78 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात 13 टक्क्यांची घट झाली आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

रायगड जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी 38 हजार 062 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 37 हजार 736 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. त्यातून 28 हजार 973 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून 71.96 टक्के मुलं तर 82.34 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तालुका निहाय निकालाच्या टक्केवारीत माणगाव आणि पनवेल तालुके अव्वल ठरले आहेत. तर मुरुड तालुक्याचा सर्वात कमी 62.04 टक्के निकाल लागला आहे.

जिहल्यातली 4 हजार 695 विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर 9 हजार 804 विद्यर्थ्यांना प्रथमवर्ग मिळाला आहे. याचबरोबर 10 हजार 731 विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर 3 हजार 743 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले.

तालुकानिहाय निकाल टक्केवारी
पनवेल - 80.26 , उरण - 73.80, कर्जत - 72.95, खालापूर - 75.17, सुधागड - 69.43, पेण - 76.63, अलिबाग - 79.31, मुरूड - 62.04, रोहा - 77.37, माणगांव - 80.41, तळा - 73.03, श्रीवर्धन - 68.91, म्हसळा - 68.16, महाड - 78.87, पोलादपूर - 77.02

Intro:

रायगडात निकालाचा टक्का घसरला

जिल्ह्याचा दहावीचा निकाल 76.78 टक्के

गेल्या वर्षीच्या तुलनेत 13 टक्क्यांची घट

निकालात मुलींची बाजी, जिल्ह्यात पनवेल अव्वल

रायगड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण  मंडळातर्फे मार्च 2019  मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्याचा निकाल 76.78 टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात 13 टक्क्यांची घट झाली. सालाबाद प्रमाणेही यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. 71.96 टक्के मुलं तर 82.34 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तालुका निहाय निकालाच्या टक्केवारीत माणगाव आणि पनवेल तालुके अव्वल ठरले.

रायगड जिल्ह्यात  दहावीच्या परीक्षेसाठी 38 हजार 062 विद्यार्थ्यांनी  नोंदणी केली होती. 37 हजार 736  विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. त्यापैकी 28 हजार 973 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रायगडचा एकुण निकाल 76.78 टक्के लागला.  4 हजार 695  विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. 9 हजार 804 विद्यर्थ्यांना प्रथमवर्ग मिळाला.10 हजार 731 विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर 3 हजार 743 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले.Body:यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली. मुलांच्या तुलनेत मुली पास होण्याचे प्रमाण अधिक राहिले. 82.34 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर 71.96 टक्के मुले उत्तीर्ण झाली. 20 हजार 423 मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 20 हजार 221 मुलं परीक्षेला बसली होती ,त्यातील 14 हजार 551 उत्तीर्ण झाली. तर 17 हजार 639 मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 17 हजार 515 मुली परीक्षेला बसल्या होत्या त्यापैकी 14 हजार 442 मुली उत्तीर्ण झाल्या. रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि पनवेल तालुक्यांचे निकाल सर्वाधिक लागला, माणगाव तालुक्याचा निकाल 80.41 तर पनवेल तालुक्याचा सर्वाधिक 80.26  टक्के तर मुरुड तालुक्याचा सर्वात कमी 62.04 टक्के निकाल लागला.
Conclusion:तालुकानिहाय निकाल

तालुका    टक्के

पनवेल       80.26
उरण        73.80
कर्जत        72.95
खालापूर      75.17
सुधागड        69.43
पेण           76.63
अलिबाग      79.31
मुरूड        62.04
रोहा         77.37 
माणगांव      80.41
तळा         73.03 
श्रीवर्धन      68.91
म्हसळा      68.16
महाड        78.87
पोलादपूर     77.02
एकूण        76.78

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.