ETV Bharat / state

ॲानलाईन पद्धतीने धान्यवाटप करण्यास रायगड रेशनिंग संघटनेचा विरोध - raigad covid 19

जिल्ह्यात करोनाचे शंभरहून अधिक रूग्ण सापडले आहेत त्यातच काही दिवसांपूर्वी पनवेलमधील धान्य दुकानदाराला धान्य वाटप करताना करोनाची लागण झाली होती. रायगड जिल्हा मुंबई-पुण्याला लागून असल्याने जिल्ह्यात रूग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यातच ॲानलाईन पद्धतीने वाटप करत असताना नागरीक व दुकानदारांचा थेट संपर्क येणार आहे.

Raigad Rationing Association
प्रमोद घोसाळकर
author img

By

Published : May 3, 2020, 5:23 PM IST

रायगड - कोरोना महामारीच्या काळात शासनाने धान्य दुकानदार आणि ग्राहकांचा थेट संपर्क होऊ नये म्हणून धान्यवाटप ॲाफलाईनने करण्याची परवानगी पुरवठा विभागाने दिली होती. मात्र, आता हे आदेश पुन्हा बदलून ॲानलाईनने मशिनवर अंगठा घेऊन धान्य पुरवठा करण्याचे आदेश मिळाले आहेत. ऑनलाइन पद्धतीने धान्य वाटप करण्यास रेशनिग संघटनेने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा रेशनकार्ड धारकांना अडचण होणार असल्याचे धान्य दुकानदार संघटनेचे प्रमोद घोसाळकर म्हणाले.

जिल्ह्यात करोनाचे शंभरहून अधिक रूग्ण सापडले आहेत त्यातच काही दिवसांपूर्वी पनवेलमधील धान्य दुकानदाराला धान्य वाटप करताना करोनाची लागण झाली होती. रायगड जिल्हा मुंबई-पुण्याला लागून असल्याने जिल्ह्यात रूग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यातच ॲानलाईन पद्धतीने वाटप करत असताना नागरीक व दुकानदारांचा थेट संपर्क येणार आहे. त्यामुळे दुकानदारांची व त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेणे, त्यांचा विमा काढणे अपेक्षित होते. मात्र, त्या गोष्टी न करता उलट शासनाने ॲानलाईन पद्धत राबवून दुकानदार व ग्राहक यांचा त्रास वाढवला आहे.

रेशन धान्य वाटप करताना आता नेटची उपलब्धता देखील आवश्यक आहे नाहीतर ग्राहकांना हेलपाटे मारावे लागणार आहेत. याने सोशियल डीस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाच्या या प्रादुर्भावात शासनाच्या या निर्णयामुळे ग्राहक व दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण झाले आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात रायगड जिल्हा धान्य दुकानदार संघटनेने थेट मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व अन्न धान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देत केलेल्या निर्णयाचा फेर विचार व्हावा, अशी मागणी केली.

शासनाच्या या निर्णयाने दुकानदार व ग्राहकांमध्ये संभ्रम असून ॲानलाईन पद्धतीने वाटप केल्यास करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वाढत असून निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देत लवकरच चर्चा करणार आहोत असे प्रमोद घोसाळकर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.