ETV Bharat / state

लॉकडाऊन : कर्नाटकात अडकले रायगडातील 500 आदिवासी मजूर कुटुंब

कोरोनामुळे केलेल्या लाँकडाऊनने रायगडातील 500 मजूर कुटुंब कर्नाटकात अडकले आहेत. त्यांचा ठेकेदारही पळून गेल्याने मजुरांची आर्थिक कोंडी झाली असून कर्नाटक स्थानिक प्रशासनाने सद्यातरी मजुरांची व्यवस्था केली आहे.

raigad poor people stuck down in karanataka state due to corona lock down
कोरोना ईफेक्ट : रायगडातील 500 मजूर कुटुंब अडकले कर्नाटकात
author img

By

Published : Mar 29, 2020, 5:39 PM IST

रायगड - करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे कामासाठी कर्नाटकमध्ये गेलेले 500 आदिवासी मजूर कुटुंब अडकले आहेत. हे सर्वजण कोळसा भट्ट्यांवर काम करण्यासाठी कर्नाटकातील चार जिल्ह्यात स्थलांतरित झाले होते. मात्र, या मजुरांना घेऊन गेलेले ठेकेदार पळून गेल्याने सर्वजण अडचणीत सापडले आहेत. या अडकलेल्या कुटुंबाची स्थानिक प्रशासनाकडून खाणे-पिणे आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील आदिवासी कुटूंब दरवर्षी कोळसा भट्ट्यांवर काम करण्यासाठी कर्नाटकमध्ये स्थलांतरीत होत असतात. अहमदनगर जिल्ह्यातील ठेकेदार त्यांना तिकडे घेऊन जातात. काम संपले, की सर्वजण आपआपल्या घरी परतत असतात. मात्र, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्याने हे सर्वजण कर्नाटकात अडकून पडले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्वांना मजुरीसाठी नेणारे ठेकेदार पळून गेल्याने मजुरांची आर्थिक कोंडी झाली. हे सर्वजण कर्नाटकमधील चिकबेलापूरमधील अनंतपूर, म्हैसूर जिल्ह्यातील नंदनगुड, शिवकाहल्ली आणि बेंगळुरूजवळील सिरा येथे हे सर्वजण अडकून पडले असल्याची माहिती सर्वहारा जनआंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी दिली.

स्थलांतरीत आदिवासी मजुरांचा हा प्रश्न सामाजिक संघटनांनी कर्नाटकमधील स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. यानंतर तेथील तहसीलदारांनी यासर्वांची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था केली आहे. मात्र लॉकडाऊन संपणार नाही तोवर या सर्वांना तिथेच राहावे लागणार आहे. या लॉकडाऊन परिस्थितीचा सर्वाधिक फटका असंघटीत कामगार आणि स्थलांतरीत मजुरांवर झाला आहे. मुळात लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी यासर्वांचा विचार होणे गरजेचे होते, पण तसे झाले नाही. त्यामुळे अनेक स्थलांतरित मजूर वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले असल्याची माहिती महाजन यांनी दिली आहे.

याबाबत बोलताना रायगडचे निवासी जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे म्हणाले, की जिल्हा प्रशासनाकडे याबाबतची तक्रार आली होती. त्याची चौकशी केली आहे. मजुरांची व्यवस्था तेथील प्रशासनाने केलेली आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत त्या सर्वांना आहे तिथेच रहावे लागले.

याविषयी बोलताना स्थलांतरीत मजूर दिनेश पवार म्हणाले, की कर्नाटकातील तहसीलदारांनी आमची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.