ETV Bharat / state

रायगडमध्ये गीते की तटकरे उत्सुकता शिगेला, दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा - निकाल

रायगड लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांना उत्सुकता लागली असून राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आमचा उमेदवार जिंकणार, असे दावे करत आहेत.

रायगडमधील निकालाबाबत प्रतिक्रिया देताना कार्यकर्ता
author img

By

Published : May 21, 2019, 5:34 PM IST

Updated : May 21, 2019, 6:41 PM IST

रायगड - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यातील मतदान पार पडले असून आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. 23 मे रोजी मतमोजणी नंतर रायगडकरांनी कोणाला कौल दिला हे कळणार आहे. मात्र, आतापासूनच दोन्हीकडील राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आमचाच उमेदवार येणार याबाबत ठाम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्यात लढत झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गीते यांनी तटकरे यांचा अवघ्या २१०० मताने पराभव केला होता. यावेळी तटकरे याना काँग्रेस पक्षाबरोबर शेकापची साथ मिळालेली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाड येथे सभा घेतल्याने त्याचा फायदा तटकरे याना मिळू शकतो त्यामुळे त्यांनी आपला विजय निश्चित मानला आहे.

रायगडमधील निकालाबाबत प्रतिक्रिया देताना कार्यकर्ता

शिवसेनेचे विद्यमान खासदार अनंत गीते हे ६ वेळा खासदार म्हणून निवडून गेले आहेत. तर ७ व्या वेळी पुन्हा खासदार म्हणून निवडून जाणार, असा विश्वास त्यांनी आधीच बोलून दाखवला आहे. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप हे ३ पक्ष एकत्र आल्याने याचा फटका गीते याना बसू शकतो असे चित्र आहे.

शिवसेना, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही गीते हमखास विजयी होणार, असे ठामपणे सांगत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकापचे कार्यकर्तेही यावेळी रायगडात बदल होऊन तटकरे विजयी होणार, असा विश्वास बोलून दाखवत आहे. मात्र निकालाची तारीख जवळ आल्याने निकालाची उत्सुकता उमेदवारासह, कार्यकर्ते आणि नागरिकांना लागून राहिली आहे.

अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर अशी एकूण ६ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण १६,५१,५६० मतदारांपैकी १०,२०,१४० मतदारांनी मतदान केले आहे. एकुण ६१.७६ टक्के मतदान झालेले आहे. २०१४च्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरला तरी १ लाख नवे मतदारही वाढलेले आहेत. त्यामुळे या नव मतदारांचे मत कोणाच्या पारड्यात पडले आहे, हे महत्वाचे ठरणार आहे.

२०१४ ला पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यत चढाओढ झाली होती. तशीच चढाओढ यावेळीही पाहायला मिळेल, असा अंदाज जाणकार बांधत आहेत. त्यामुळे विजयाचा गुलाल कोण उडवणार याबाबत रायगडकराना उत्सुकता लागून राहिली आहे.

Intro:निकालाची रायगडकराना लागली उत्सुकता

गीते की तटकरे उत्सुकता शिगेला

दोन्ही राजकीय कार्यकर्त्यांना आपलेच उमेदवार जिंकण्याची आशा

रायगड : 17 व्या लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्यातील मतदान पार पडले असून आता उत्सुकता आहे ती 23 मे च्या निकालाची. रायगड लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीचे मतदान 23 एप्रिल रोजी पार पडले. त्यानंतर महिन्याभर मतमोजणीसाठी वाट पाहावी लागली आहे. त्यामुळे महिनाभर शिवसेनेचे अनंत गीते की राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे येणार याची चर्चा रंगलेली आहे. 23 मे ला मतमोजणी नंतर रायगड करांनी कोणाला कौल दिला हे कळणारच आहे. मात्र तूर्तास तरी राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आमचाच उमेदवार येणार याबाबत ठाम असल्याचे चित्र आहे.Body:रायगड लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री अनंत गीते व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्यात ही लढत झालेली आहे. 2014 च्या लोकसभां निवडणुकीत अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांचा अवघ्या 2100 मताने पराभव केला होता. यावेळी सुनील तटकरे याना काँग्रेस पक्षाबरोबर शेकापची साथ मिळालेली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाड येथे सभा घेतल्याने त्याचा फायदा तटकरे याना मिळू शकतो त्यामुळे त्यांनी आपला विजय निश्चित मानला आहे.

शिवसेनेचे विद्यमान खासदार अनंत गीते हे सहा वेळा खासदार म्हणून निवडून गेले आहेत. तर सातव्या वेळी पुन्हा खासदार म्हणून निवडून जाणार असा विश्वास त्यांनी आधीच बोलून दाखविला आहे. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप हे तीन पक्ष एकत्र आल्याने याचा फटका गीते याना पडू शकतो असे चित्र आहे.
Conclusion:शिवसेना, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही गीते हमखास येणार असे ठामपणे सांगत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकापचे कार्यकर्तेही यावेळी रायगडात बदल होऊन तटकरे विजयी होणार असा विश्वास बोलून दाखवत आहे. मात्र निकालाची तारीख जवळ आल्याने निकालाची उत्सुकता उमेद्वारासह, कार्यकर्ते व नागरिकांना लागून राहिली आहे.

32 रायगड लोकसभा मतदारसंघासाठी अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, दापोली,गुहागर अशी एकूण सहा विधानसभा मतदारसंघामध्ये  एकूण 16,51,560 मतदारांपैकी 10,20,140 मतदारांनी मतदान केले आहे. एकुण 61.76 टक्के मतदान झालेले आहे. 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरला तरी एक लाख नवं मतदारही वाढलेले आहेत. त्यामुळे या नवं मतदारांचे मत कोणाच्या पारड्यात पडले आहे. हे महत्वाचे आहे.

2014 ला पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यत चढाओढ झाली होती. तशीच चढाओढ यावेळीही पाहायला मिळेल असा अंदाज जाणकार बांधीत आहेत. त्यामुळे विजयाचा गुलाल कोण उडविणार याबाबत रायगडकराना उत्सुकता लागून राहिली आहे.
Last Updated : May 21, 2019, 6:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.