ETV Bharat / state

रायगड : 'ही' आहेत तटकरेंच्या विजयाची कारणे, 'या'मुळे झाला गीतेंचा पराभव - शिवसेना

रायगड लोकसभा निवडणुकीत 16 उमेदवार रिंगणात उभे होते. मात्र, खरी लढत तटकरे विरुद्ध गीते अशीच झाली.

सुनील तटकरे
author img

By

Published : May 24, 2019, 5:48 PM IST

रायगड - लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी विद्यमान खासदार, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा ३१ हजार ४३८ मतांनी दणदणीत पराभव केला. त्यामुळे अनंत गीते याची विजयाची हॅट्रिक हुकली आहे. या विजयाबरोबरच तटकरे यांनी २०१४ च्या पराभवाचे उट्टे भरून काढले आहे.

रायगड लोकसभा निवडणुकीत 16 उमेदवार रिंगणात उभे होते. मात्र, खरी लढत तटकरे विरुद्ध गीते अशीच झाली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला होता. गीते यांनी तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तर तटकरेंनी निष्क्रिय खासदार म्हणून गीतेंवर टीका केली होती. त्यामुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हेच प्रचाराचे खरे मुद्दे ठरले होते. मात्र, निकालानंतर तटकरे यांच्या पारड्यात मतदारांनी कौल दिला आणि त्यांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवले.

रायगड लोकसभेचा निकाल हा पुढे होणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे निकालानंतर सहाही विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती बदललेली दिसत आहे. या निकालामुळे प्रस्थापितांना मात्र आधीच धोक्याचा इशारा मिळाला आहे.

ईटीव्हीचे प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, अशी महाआघाडी यावेळी रायगडात झाली होती. शेकाप पहिल्यांदाच या महा आघाडीत सामील झाला होता. त्यामुळे मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये कुठे तरी नाराजी होती. ही नाराजी अलिबाग मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दिसत होती. त्यामुळेच सुनील तटकरे याना अपेक्षित असलेली मते शेकाप आणि काँग्रेस पक्ष देण्यात कुठे तरी कमी पडले. अलिबाग विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप काँग्रेस यांची मिळून साधारण सव्वा लाख मते होती. मात्र प्रत्यक्षात तटकरे यांना ९६ हजार ६३९ मते पडली. तर शिवसेना भाजपकडे ६५ हजार मते होती. यात वाढ झाली असून ७९ हजार ४७९ मते पडली. त्यामुळे गीते यांना वाढलेली मते ही आघाडीचीच मते पडली असल्याचे चित्र आहे. येथून तटकरे याना १७ हजार १४२ चे मताधिक्य मिळालेले आहे.

पेण मतदार संघात अनंत गीते याना ९० हजार ५८८ तर सुनील तटकरे याना ८९ हजार २८१ एवढी मते पडली. त्यामुळे गीतेंना याठिकाणी १ हजार ३०७ चे मताधिक्य मिळाले आहे. श्रीवर्धनमध्ये तटकरे यांनी शिवसेनेला गाफील ठेवून छुपी मोर्चे बांधणी केल्याने तटकरे यांना ८५ हजार ८८० तर गींतेना ५१ हजार ००९ मते पडली. त्यामुळे तटकरे यांना ३४ हजार ८७१ मताची भरघोस आघाडी मिळाली.

महाड विधानसभा मतदारसंघात गीते याना ८१ हजार ९३८ तर तटकरेंना ७५ हजार ११३ एवढे मतदान झाले आहे. त्यामुळे गीतेना फक्त ६ हजार ८२५ ची आघाडी मिळाली. दापोली विधानसभा मतदारसंघात गीतेना ८६ हजार २६६ तर तटकरे याना ७० हजार ४५९ मते मिळाली. गीतेना येथून १५ हजार ८०७ मताधिक्य मिळाले. गुहागर मधून गीते याना ६३ हजार ६४४ मते तटकरे याना ६१ हजार ३६४ एवढी मते पडली आहेत. २ हजार २८० चे मताधिक्य गीतेंना मिळाले आहे.

अनंत गीते यांना पेण, महाड, दापोली, गुहागर या ४ विधानसभा मतदार संघात २६ हजार २१९ चे मताधिक्य मिळाले आहे. तर तटकरे याना अलिबाग आणि श्रीवर्धन या २ मतदार संघात सर्वाधिक ५२ हजार १३ एवढे मताधिक्य मिळाल्याने त्यांचा विजय सुकर झाला आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ हा खरा तटकरेसाठी लाभदायक ठरला आहे.

वंचित आणि अपक्ष उमेदवारांनी गाठला पाच अंकी आकडा

वंचित बहुकन आघाडीच्या उमेदवार सुमन कोळी यांनीही लोकसभा निवडणुकीत २३ हजार १९६ मते पडली. तर अपक्ष सुनील तटकरे याने ९ हजार ७५२ तर सुभाष पाटील यांनी १२ हजार २६५ मते पारड्यात पाडून घेतली. ही मते तटकरे यांच्या विरोधात पडलेली असली तरी त्याचा फायदा गीते यांनाही झालेला नाही. मात्र, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवारांना पडलेली मते गीतेंना पाडण्यासाठी तटकरेंना लाभदायक ठरली आहेत.

तटकरे यांची विजयाची कारणे

  • काँग्रेस, शेकापची साथ
  • अचूक मोर्चे बांधणी
  • राज ठाकरे सभा लाभदायक
  • गुहागर, दापोली मतदार संघात केलेली मोर्चे बांधणी
  • मतदारांशी संपर्क
  • नाराज असलेल्यांना घेतले सोबत
  • मुस्लिम समाज सोबत
  • मोदी लाटेचा परिणाम नाही

Intro:रायगड लोकसभा विश्लेषण

रायगड : 32 रायगड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी विद्यमान खासदार, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा 31 हजार 438 मताने दणदणीत पराभव केला. त्यामुळे अनंत गीते याची विजयाची हट्रिक हुकली असून सुनील तटकरे यांनी 2014 च्या पराभवाचे उट्टे भरून काढले आहे.

रायगड लोकसभा निवडणुकीत 16 उमेदवार रिंगणात उभे होते. मात्र खरी लढत झाली ती तटकरे विरुद्ध गीते अशी. निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोन्ही उमेदवारानी प्रचाराचा वेग वाढविला होता. अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. सुनील तटकरे यांनी निष्क्रिय खासदार म्हणून आपल्या भाषणात टीका केली होती. त्यामुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हेच प्रचाराचे खरे मुद्दे ठरले होते. मात्र निकालानंतर सुनील तटकरे यांच्या पारड्यात मतदारांनी कौल दिला आणि त्यांना खासदार म्हणून दिल्लीत पाठविले.

रायगड लोकसभेचा निकाल हा पुढे होणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे निकालानंतर सहाही विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती बदललेली दिसत आहे. या निकालामुळे प्रस्थापितांना मात्र आधीच धोक्याचा इशारा मिळाला आहे.

Body:

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप अशी महाआघाडी यावेळी रायगडात झाली होती. शेकाप हा पहिल्यांदाच या महा आघाडीत सामील झाला होता. त्यामुळे मतदार व कार्यकर्त्यांमध्ये मध्ये कुठे तरी नाराजी होती. ही नाराजी अलिबाग मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दिसत होती. त्यामुळेच सुनील तटकरे याना अपेक्षित असलेली मते शेकाप व काँग्रेस पक्ष देण्यात कुठे तरी कमी पडले आहेत. अलिबाग विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप काँग्रेस यांची मिळून साधारण सव्वा लाख मते होती. मात्र प्रत्यक्षात तटकरे यांना 96 हजार 639 मते पडली. तर शिवसेना भाजपकडे 65 हजार मते होती. यात वाढ झाली असून 79 हजार 497 मते पडली. त्यामुळे गीते याना वाढलेली मते ही आघाडीचीच मते पडली असल्याचे चित्र आहे. येथून तटकरे याना 17 हजार 142 चे मताधिक्य मिळालेले आहे.

पेण मतदार संघात अनंत गीते याना 90 हजार 588 तर सुनील तटकरे याना 89 हजार 281 एवढी मते पडली. त्यामुळे गीतेना याठिकाणी 1 हजार 307 चे मताधिक्य मिळाले आहे. श्रीवर्धनमध्ये तटकरे यांनी शिवसेनेला गाफील ठेवून छुपी मोर्चे बांधणी केल्याने तटकरे यांना 85 हजार 880 तर गीतेना 51 हजार 009 मते पडली. त्यामुळे तटकरे याना 34 हजार 871 मताची भरघोस आघाडी मिळाली.

महाड विधानसभा मतदारसंघात गीते याना 81 हजार 938 तर तटकरेंना 75 हजार 113 एवढे मतदान झाले आहे. त्यामुळे गीतेना फक्त 6 हजार 825 ची आघाडी मिळाली. दापोली विधानसभा मतदारसंघात गीतेना 86 हजार 266 तर तटकरे याना 70 हजार 459 मते मिळाली. गीतेना येथून 15 हजार 807 मताधिक्य मिळाले. गुहागर मधून गीते याना 63 हजार 644 मते तटकरे याना 61 हजार 364 एवढी मते पडली आहेत. 2 हजार 280 चे मताधिक्य गीते यांना मिळाले आहे.

अनंत गीते याना पेण, महाड, दापोली, गुहागर या चार विधानसभा मतदार संघात 26 हजार 219 चा लीड मिळाला आहे. तर तटकरे याना अलिबाग व श्रीवर्धन या दोन मतदार संघात सर्वाधिक 52 हजार 13 एवढे मताधिक्य मिळाल्याने त्याचा विजय सुकर झाला आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ हा खरा तटकरेसाठी लाभदायक ठरला आहे.

52013
26219

Conclusion:*वंचित व अपक्ष उमेदवारांनी गाठला पाच अंकी आकडा*

वंचित बहुकन आघाडीच्या उमेदवार सुमन कोळी यांनीही लोकसभा निवडणुकीत 23 हजार 196 मते पडली. तर अपक्ष सुनील तटकरे याने 9 हजार 752 तर सुभाष पाटील याने 12 हजार 265 मते पारड्यात पाडून घेतली. ही मते सुनील तटकरे यांच्या विरोधात पडलेली असली तरी त्याचा फायदा गीते यांनाही झालेला नाही. मात्र वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवारांना पडलेली मते गीतेना पाडण्यासाठी तटकरे याना लाभदायक ठरली आहेत.

।*तटकरे याची विजयाची कारणे*

काँग्रेस, शेकापची साथ

अचूक मोर्चे बांधणी

राज ठाकरे सभा लाभदायक

गुहागर, दापोली मतदार संघात केलेली मोर्चे बांधणी

मतदारांशी संपर्क

नाराज असलेल्यांना घेतले सोबत

मुस्लिम समाज सोबत

मोदी लाटेचा परिणाम नाही

---------------------------------

*अनंत गीते यांच्या पराजयाची कारणे*

मतदारसंघात कोणताही प्रकल्प आणता आला नाही

पक्षातील अंतर्गत कुरघोडीचा फटका

श्रीवर्धन मतदार संघातील गाफीलपणा

कुणबी समाजाची मते काही प्रमाणात फिरली

मुस्लिम मतदार बाजूला

नविद अंतुलेचा चमत्कार फोल

अपक्ष उमेदवारांचा फटका

---------------------------------------------

*लोकसभा निकालानंतर विधानसभा कोणाला अनुकूल*

अलिबागमध्ये शिवसेनेला वाढलेली मते शेकाप व काँग्रेसला डोकेदुखी

श्रीवर्धन मतदार संघ राष्ट्रवादीला अनुकूल

पेण मतदार संघात रवी पाटील भाजपात आल्याने गीतेचे मताधिक्य वाढले याचा फायदा विधानसभेला होणार

महाड, गुहागर, दापोली विधानसभा मतदारसंघात तटकरे याना पडलेली मते आगामी विधानसभेसाठी शिवसेनेला डोकेदुखी ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.