रायगड: महाड-रायगड रस्त्यावर गोंडाळे फाट्या शेजारी झालेल्या कार अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून रस्त्याशेजारील नाल्यात कार पलटी झाल्याचे समजत आहे. हा अपघात मंगळवारी रात्री साडेआकरा वाजता झाला आहे.
हेही वाचा - हिंगोलीत अज्ञातांनी फोडल्या बसच्या काचा; औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अपघातामध्ये महाडमधील उद्योजक नितीन मेहता यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच महाड शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक शैलेश सणस आणि बांधकाम व्यवसाईक योगेश कळमकर हे जखमी झाले आहेत. जखमींवर महाडमधील खजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून ४ घरफोड्या, तर एका दुकानातील मुद्देमाल लंपास