ETV Bharat / state

रायगड जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के - रायगड कोरोनामुक्तीकडे

रायगड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही कमी होऊ लागली आहे. जिल्ह्यात सध्या 1368 रुग्ण हे उपचार घेत असून कोरोनाने 1544 नागरिकांचा बळी घेतलेला आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण हे 90 टक्यावर गेले असल्याने कोरोना आता आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे.

रायगड जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
रायगड जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
author img

By

Published : Oct 30, 2020, 2:30 PM IST

रायगड - मार्च महिन्यापासून कोरोना महामारीने थैमान घातले असून आठ महिन्यानंतर रायगड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही कमी होऊ लागली आहे. जिल्ह्यात सध्या 1368 रुग्ण हे उपचार घेत असून कोरोनाने 1544 नागरिकांचा बळी घेतलेला आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण हे 90 टक्यावर गेले असल्याने कोरोना आता आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. रोज रुग्ण भेटण्याच्या प्रमाणातही कमालीची घट झाली आहे. त्यामुळे लवकरच रायगड जिल्हा हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने आनंदाची बाब ठरली आहे.

रायगड हा मुंबईला लागून असलेला जिल्हा असून कोरोनाचा शिरकाव हा झपाट्याने होऊ लागला होता. पनवेल महानगर पालिका हद्दीतही कोरोनाने थैमान घातले होते. जिल्ह्यातील इतर तालुक्यातही कोरोना प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले होते. रोज आठशे ते नऊशे रुग्ण हे बाधीत आढळत होते. कोरोनामुळे आरोग्य आणि जिल्हा प्रशासन यंत्रणा अहोरात्र सक्रियपणे काम करीत आहे.

माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेचा प्रभाव-

कोरोनाच्या नियमाचे पालन नागरिक करीत असून माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोरोना प्रादुर्भाव हा आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या वाढलेल्या तपासण्या आणि प्रशासनाच्या जनजागृतीमुळे नागरिकाच्या सहकार्याने कोरोना जिल्ह्यात आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. नवरात्रीनंतर पुन्हा कोरोना रुग्ण वाढतील असा अंदाज हा आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने बांधला होता. मात्र हा अंदाज सध्याच्या घडीला खोटा ठरला आहे. तर दिवाळीत पुन्हा दुसरे पीक येणार असल्याचाही अंदाज बांधण्यात आलेला आहे.

जिल्ह्यात 2 लाख नागरिकांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी 53 हजार 712 जण हे कोरोना बाधीत मार्च महिन्यापासून आढळले आहेत. 50 हजार 800 जण हे कोरोनामुक्त होऊन बरे झाले आहेत. सध्यस्थीतीत 1368 जणांवर विविध रुग्णालयात आणि घरात उपचार सुरू आहेत. त्यामुळे लवकरच रायगड जिल्हा हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे.

तालुकानिहाय रुग्ण संख्या

पनवेल (मनपा) 708, पनवेल ग्रामीण 321, उरण 48, खालापूर 63, कर्जत 9, पेण 64, अलिबाग 68, मुरुड 6, माणगाव 21, तळा 1, रोहा 39, सुधागड 3, श्रीवर्धन 2, म्हसळा 3, महाड 8, पोलादपूर 4

तालुकानिहाय मृत्यू संख्या

पनवेल (मनपा) 546, पनवेल ग्रामीण 131, उरण 109, खालापूर 117, कर्जत 97, पेण 100, अलिबाग 137, मुरुड 24, माणगाव 37, तळा 9 रोहा 84, सुधागड 26, श्रीवर्धन 21, म्हसळा 13 महाड 74, पोलादपूर 19

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.