ETV Bharat / state

रायगडमधील घटलेला मतदानाचा टक्का कोणाला देणार धक्का? - shirvardhan constituent assembly

सात विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असली, तरीही यंदा मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. प्रशासनाकडून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. परंतू, मतदारांचा प्रतिसाद कमी झाल्याने सातही विधानसभा मतदारसंघात 65.86 टक्के मतदान झाले.

रायगडमधील घटलेला टक्क्याचा कोणाला होणार तोटा?
author img

By

Published : Oct 22, 2019, 9:15 PM IST

रायगड - सात विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असली, तरीही यंदा मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. प्रशासनाकडून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. परंतू, मतदारांचा प्रतिसाद कमी झाल्याने सातही विधानसभा मतदारसंघात 65.86 टक्के मतदान झाले.

यंदा जिल्ह्यात पुरुष मतदारांचा टक्का वाढलेला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 70.25 टक्के मतदान झाले होते. 2019 च्या निवडणुकीत 4.39 टक्क्याने मतांचा टक्का घसरला आहे. त्यामुळे या घसरलेल्या टक्क्याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाचा होणार हे 24 ऑक्टोबरला मतमोजणी नंतर कळणार आहे.

निवडणुकीआधी जिल्हा प्रशासनाकडून मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने जनजागृती करण्यात आली होती. प्रसिद्ध माध्यम, जाहिरात, पथनाट्य, बॅनरबाजी या मार्गाने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. राजकीय पक्षांनीही मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले होते. यंदा 35 टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे.

जिल्ह्यात अलिबाग, पेण, कर्जत, पनवेल, उरण, श्रीवर्धन, महाड हे सात विधानसभा मतदारसंघ आहेत. 2019 च्या विधानसभा मतदारसंघात पनवेल 54.13, कर्जत 70.81, उरण 74.32, पेण 71.28, अलिबाग 72.61, श्रीवर्धन 60.84, महाड 66.98, असे एकूण मतदान 65.86 टक्के झाले आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत पनवेल 66.73, कर्जत 75.26, उरण 77.67, पेण 71.44, अलिबाग 73.05, श्रीवर्धन 62.43, महाड 67.12 एकूण 70.25 टक्के मतदान झाले होते.

यंदा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात 22 लाख 66 हजार 679 मतदार होते. 2714 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. 7 लाख 82 हजार 580 पुरुष मतदार, 7 लाख 13 हजार 782 महिला मतदार आणि एक तृतीयपंथी असे एकूण 14 लाख 96 हजार 363 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

2014 च्या तुलनेत या मतदारसंघांमध्ये पनवेल 12.6, कर्जत 4.45, उरण 3.35, पेण 0.16, अलिबाग 0.46 श्रीवर्धन 1.59, महाड 0.14 ने टक्केवारी घसरली असून, 2019 च्या निवडणुकीत जिल्ह्यातील एकूण 4.39 टक्याने मतांची टक्केवारी घसरली आहे.

यंदाच्या निवडणुकीत घटलेला टक्का बघता प्रस्थापितांना याचा फटका पडणार की फायदा होणार याबाबत सध्या चर्चा रंगली आहे.

जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंमध्ये विद्यमान आमदारांबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी होती. मतदारसंघात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या मूलभूत सुविधा पोहचवण्यात विद्यमान आमदार कमी पडले आहेत. मतदारांमध्ये असलेली नाराजी ही मतदानावर परिणाम करणारी ठरली आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का यावेळी घसरल्याचे चित्र दिसत आहे. मात्र घसरलेला हा मतांचा टक्का नक्की कोणाच्या पारड्यात विजयाचे वाण टाकणार हे 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

Intro:

रायगडातील घटलेला टक्का कोणाला फायदेशीर ठरणार

सातही मतदारसंघात घटला मतांचा टक्का

रायगड : विधानसभा निवडणुकीचे मतदान 21 ऑक्टोबर रोजी पार पडले. रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असली तरी मतदारांमध्ये अनुउत्सुकता पाहायला मिळाली. जिल्हा प्रशासनाकडून मताचा टक्का वाढविण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करण्यात आले होते. असे असतानाही मतदारांचा प्रतिसाद जास्त ना मिळाल्याने सात विधानसभा मतदारसंघात 65.86 टक्के मतदान झाले. यामध्ये पुरुष मतदारांचा टक्का यावेळी वाढलेला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 70.25 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत 4.39 टक्याने मतांचा टक्का घसरला आहे. त्यामुळे या घसरलेल्या टक्याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाचा होणार हे 24 ऑक्टोबरला मतमोजणी नंतर कळणार आहे.

जिल्ह्यात सातही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीआधी जिल्हा प्रशासनाकडून मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने जनजागृती केली होती. प्रसिद्ध माध्यम, जाहिरात, पथनाट्य, बॅनरबाजी या मार्गाने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. राजकीय पक्षांनीही मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले होते. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे महत्वाचे असूनही 35 टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे.

Body:रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, कर्जत, पनवेल, उरण, श्रीवर्धन, महाड हे सात विधानसभा मतदारसंघ आहेत. 2019 च्या विधानसभा मतदारसंघात पनवेल 54.13, कर्जत 70.81, उरण 74.32, पेण 71.28, अलिबाग 72.61, श्रीवर्धन 60.84, महाड 66.98, असे एकूण मतदान 65.86 टक्के झाले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पनवेल 66.73, कर्जत 75.26, उरण 77.67, पेण 71.44, अलिबाग 73.05, श्रीवर्धन 62.43, महाड 67.12 एकूण 70.25 टक्के मतदान झाले होते.Conclusion:
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघात 22 लाख 66 हजार 679 मतदार होते. 2714 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. 7 लाख 82 हजार 580 पुरुष मतदार, 7 लाख 13 हजार 782 महिला मतदार आणि एक तृतीयपंथी असे एकूण 14 लाख 96 हजार 363 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

2014 च्या तुलनेत सात विधानसभा मतदारसंघात पनवेल 12.6, कर्जत 4.45, उरण 3.35, पेण 0.16, अलिबाग 0.46 श्रीवर्धन 1.59, महाड 0.14 ने टक्केवारी घसरली असून 2019 च्या निवडणुकीत जिल्ह्यातील एकूण 4.39 टक्याने मतांची टक्केवारी घसरली आहे.

सात विधानसभा मतदारसंघात घटलेला टक्का पाहता प्रस्थापितांना याचा फटका पडणार की फायदा होणार याबाबत आता चर्चा रंगली आहे. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांनी विकासकामात केलेली चालढकलपणा यामुळे मतदारामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. मतदारसंघात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या मूलभूत सुविधा पोहचविण्यात जिल्ह्यातील विद्यमान आमदार कुठे तरी कमी पडले आहेत. मतदारांमध्ये असलेली नाराजी ही मतदानावर परिणाम करणारी ठरली आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का यावेळी घसरल्याचे चित्र दिसत आहे. मात्र घसरलेला हा मतांचा टक्का नक्की कोणाच्या पारड्यात विजयाचे वाण टाकणार हे 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणीनंतर कळणार आहे.

-----------------------------

2019 विधानसभा निहाय पुरुष / महिला झालेले मतदान

मतदारसंघ    पुरुष       महिला         एकूण

पनवेल    165976   135727     301703

कर्जत     105917     93928      199845

उरण       112675   105935     218611

पेण        112402   102771     215173

अलिबाग  109249  104655     213904

श्रीवर्धन      78086    78596     156682

महाड        98275     92170      190445

-----------------------------------------------------------

एकूण      782580    713782    1496363
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.