ETV Bharat / state

#Cyclone 'निसर्ग' : रायगडमधील म्हसळा तालुक्यात लाखोंचे नुकसान - रायगड म्हसळा निसर्ग चक्रिवादळ

कोरोनाच्या संकटातून सुटका झालेली नसताना, नैसर्गिक संकटाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरु झालेल्या चक्रीवादळाचा तडाखा सुमारे तीन तास सुरु होता. अपेक्षेप्रमाणे जास्त थैमान घालून या वादळाने क्षणात होत्याचे नव्हते करुन टाकले. यामुळे म्हसळा तालुक्यात लाखोंचे नुकसान झाले आहे.

Nisarga cyclone effect
निसर्ग वादळाने म्हसळात नुकसान.
author img

By

Published : Jun 4, 2020, 4:33 PM IST

रायगड - मुंबईतील अनेक भागांसह जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यालाही ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. वादळात अनेक घरे, इमारतींवरील छप्पर उडाले. घरांवर झाडे कोसळली. तसेच रस्ते बंद झाल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले. यात लाखोंचे नुकसान झाले आहे.

कोरोनाच्या संकटातून सुटका झालेली नसताना, नैसर्गिक संकटाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरु झालेल्या चक्रीवादळाचा तडाखा सुमारे तीन तास सुरु होता. अपेक्षेप्रमाणे जास्त थैमान घालून या वादळाने क्षणात होत्याचे नव्हते करुन टाकले. यामुळे म्हसळा तालुक्यात लाखोंचे नुकसान झाले आहे.

वादळात प्रस्तावित कोव्हीड सेंटर म्हणजेच आय.टी.आय.च्या वरवठणे येथील इमारतीवरील पत्र्याचे छप्पर उद्ध्वस्त झाले. तसेच तालुक्यात अनेक घरांचे नुकसान झाले आहे. कोळे येथील रहिवासी विलास चाळके यांच्या घरावरील संपूर्ण छप्पर उडून गेले. तर शहरातील घनसार लॉजवरील आणि डॉ. सुधीर चोचे यांच्यादेखील इमारतीवरील पत्र्याची शेड कोलमडून पडली आहे. शहराबाहेर कादरी पेट्रोल पंपाशेेेजारी स्टार भारतासमोर झाडाची मोठी फांदी कोसळली आहे.

याबरोबरच सुमारे 100 वर्षांपूर्वीचे वडाचे झाड सुरेश बोरकर आणि नरेश बोरकर यांच्या घरावर कोसळून लाखोंचे नुकसान झाले आहे. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे कुंभार वाडा येथील रहिवासी सुशील म्हशिलकर यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून त्यांच्या घराचेही नुकसान झाले आहे.

याबाबत जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.