ETV Bharat / state

अर्णब प्रकरण : रायगड न्यायालयातील पुनर्विचार याचिका, जामीन अर्जाबाबत आजच्या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष

उच्च न्यायालयात अंतरिम जामीन हा अर्णब गोस्वामी याचा फेटाळला. त्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून तिघांना अंतरिम जामीन अर्ज मंजूर केला आहे. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असलेल्या रायगड पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेवर आणि दोघांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

arnab goswami
अर्णब प्रकरण
author img

By

Published : Nov 23, 2020, 11:20 AM IST

रायगड - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात एका खासगी वृत्तवाहिनीचे संपादक आणि मालक अर्णब गोस्वामी यांच्यासह दोन जणांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र, आज रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या जिल्हा सत्र न्यायालयातील पुनर्विचार याचिका आणि जामीन अर्जावर आज 23 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. तर अर्णबच्या वकिलांनी सत्र न्यायालयातील जामीन अर्ज काढुन घेतला असला तरी फिरोज शेख आणि नितेश सरडा यांनी जिल्हा सत्र न्यायालयातील जामीन अर्ज काढलेला नाही. त्यामुळे त्याच्या अर्जावरही आज याबाबत निकाल येण्याची शक्यता आहे.

पुनर्विचार याचिका आणि जामिनावर आज 23 नोव्हेंबरला सुनावणी -

उच्च न्यायालयात अंतरिम जामीन हा अर्णब गोस्वामी याचा फेटाळला. त्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून तिघांना अंतरिम जामीन अर्ज मंजूर केला आहे. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असलेल्या रायगड पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेवर आणि दोघांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुढे ढकलण्यात आली होती. यानंतर आज याबाबत सुनावणी होणार आहे.

हेही वाचा - जनतेची जबाबदारी माझ्यावर, हे उघडा ते उघडा म्हणणाऱ्यांवर नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

अर्णब गोस्वामीचा जामीन अर्ज मागे तर नितेश आणि फिरोज याचा अर्ज न्यायलयात -

अर्णब गोस्वामी यांनी जिल्हा सत्र न्यायालयात केलेला जामीन अर्ज आज त्याच्या वकिलांनी मागे घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळेपर्यत फिरोज शेख व नितेश सारडा यांना अतंरिम जामीन सर्वोच्च न्यायालयातून मिळाला असुनही या प्रकरणातून कायम स्वरुपाचा आपला जामीन अर्ज अजून मागे घेतलेला नाही. तर नितेश सरडा आणि फिरोज शेख याच्या जामीन अर्जावर ही आज सुनावणी होऊन निकाल मिळण्याची शक्यता आहे.

आजच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष -

रायगड पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेबाबत उच्च न्यायालयाने आक्षेप घेतला नाही आणि सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे पुनर्विचार याचिकेवर निकाल देण्याबाबत सरकारी वकिलांनी मागणी जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याकडे केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत आल्यानंतर 23 नोव्हेंबरला सुनावणी घेऊ असे न्यायालयाने सांगितले होते. त्यामुळे आज न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.