ETV Bharat / state

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : कमी मतदानाचा रायगडमध्ये कोणाला बसणार फटका? - श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ

यंदा जिल्ह्यात पुरुष मतदारांचा टक्का वाढलेला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 70.25 टक्के मतदान झाले होते. 2019 च्या निवडणुकीत 4.39 टक्क्याने मतांचा टक्का घसरला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : कमी मतदानाचा रायगडमध्ये कोणाला बसणार फटका?
author img

By

Published : Oct 23, 2019, 12:08 PM IST

रायगड - रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलीबाग, महाड आणि श्रीवर्धन या मतदारसंघाचा समावेश होतो. या सात विधानसभा मतदारसंघात यंदाची मतदान प्रक्रिया पार पडली असली, तरीही मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. प्रशासनाकडून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. परंतू, मतदारांचा प्रतिसाद कमी झाल्याने सातही विधानसभा मतदारसंघात 65.86 टक्के मतदान झाले.

यंदा जिल्ह्यात पुरुष मतदारांचा टक्का वाढलेला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 70.25 टक्के मतदान झाले होते. 2019 च्या निवडणुकीत 4.39 टक्क्याने मतांचा टक्का घसरला आहे. त्यामुळे या घसरलेल्या टक्क्याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाचा होणार हे 24 ऑक्टोबरला मतमोजणी नंतर कळणार आहे. 2014 च्या तुलनेत या मतदारसंघांमध्ये पनवेल 12.6, कर्जत 4.45, उरण 3.35, पेण 0.16, अलिबाग 0.46 श्रीवर्धन 1.59, महाड 0.14 ने टक्केवारी घसरली असून, 2019 च्या निवडणुकीत जिल्ह्यातील एकूण 4.39 टक्याने मतांची टक्केवारी घसरली आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघ -

राज्यात झालेल्या 2014 विधानसभा निवडणुकीत पनवेल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या प्रशांत ठाकूर यांनी 1 लाख 25 हजार 142 एवढी मते घेत विजय मिळवला. पनवेल विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर PWPI चे बळीराम पाटील होते. त्यांना 1 लाख 11 हजार 927 मते मिळाली. आणि त्यांचा 13 हजार 215 मतांनी पराभव झाला. पनवेल विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर शिवसेनेचे वासुदेव घरत, चौथ्या स्थानावर काँग्रेसचे आर सी घरत आणि पाचव्या क्रमांकावर मनसेचे केसरीनाथ पाटील होते. यंदाच्या निवडणूकीतही भाजपकडून प्रशांत ठाकूर परत एकदा निवडणूकीच्या रिगंणात उतरले आहेत.

कर्जत विधानसभा मतदारसंघ -

कर्जत विधानसभा मतदारसंघातून 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश लाड यांनी 57 हजार 013 एवढी मते घेत विजय मिळवला. कर्जत विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर PWPI चे महेंद्र थोरवे होते. त्यांना 55 हजार 113 मते मिळाली. आणि त्यांचा 1 हजार 900 मतांनी पराभव झाला. कर्जत विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर शिवसेनेचे हनुमंत पिंगळे, चौथ्या स्थानावर भाजपचे राजेंद्र येरुणकर आणि पाचव्या क्रमांकावर काँग्रेस चे शिवाजी खारीक होते. मागच्या निवडणूकीत फार कमी मतांनी पराभूत झालेले महेंद्र थोरवे यंदा शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड आणि थोरवे यांच्यात ही चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे.

उरण विधानसभा मतदारसंघ -

उरण विधानसभा मतदारसंघता मागील निवडणूकीत ७७ टक्के मतदान झाले होते. तेव्हा शिवसेनेच्या मनोहर भोईर यांनी 56 हजार 131 एवढी मते घेत विजय मिळवला. उरण विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर PWPI चे विवेक पाटील होते. त्यांना 55 हजार 320 मते मिळाली. आणि त्यांचा हजार 811 मतांनी पराभव झाला. उरण विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर काँग्रेस चे मंहेंद्र घरत, चौथ्या स्थानावर भाजपचे महेश बाल्दी आणि पाचव्या क्रमांकावर मनसेचे अतुल भगत होते. यंदाच्या निवडणूकीत शिवसेनेकडून मनोहर भोईर परत एकदा निवडणूक लढवत असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

पेण विधानसभा मतदारसंघ -

PWPI च्या धैर्यशील पाटील यांनी 64 हजार 616 एवढी मते घेत पेण विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेसच्या रविशेठ पाटील यांचा 4 हजार 120 मतांनी पराभव केला होता. यंदा रविशेट पाटील परत एकदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

अलीबाग विधानसभा मतदारसंघ -

अलीबाग विधानसभा मतदारसंघातून PWPI च्या सुभाष पाटील यांनी 76 हजार 959 एवढी मते घेत विजय मिळवला. अलीबाग विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे महेंद्र दळवी होते. त्यांना 60 हजार 865 मते मिळाली. आणि त्यांचा 16 हजार 094 मतांनी पराभव झाला. अलीबाग विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर काँग्रेसचे मधुकर ठाकूर, चौथ्या स्थानावर भाजपचे प्रकाश काथे आणि पाचव्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश मोहिते होते. यंदा शिवसेनेकडून महेंद्र दळवी परत एकदा आपले नशीब आजमावत आहेत. अलिबाग विधानसभा मतदारसंघात 1952 पासून फक्त 4 वेळा काँग्रेसचे पुरुष उमेदवार निवडून आले आहेत. या मतदारसंघात 1957 साली आणि आता 2019 च्या निवडणुकीत महिलेला काँग्रेसने संधी दिली आहे. 2019 च्या निवडणुकीसाठी माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र अॅड. प्रवीण ठाकूर, राजेंद्र ठाकूर आणि सून अॅड. श्रद्धा ठाकूर या तिघांनी उमेदवारी काँग्रेसकडे मागितली होती. तर पक्षाने महिला सक्षमीकरणमुळे श्रद्धा ठाकूर यांच्या पारड्यात उमेदवारी टाकली. त्यामुळे राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ -

मागील विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस च्या अवधूत तटकरे यांनी 61 हजार 038 एवढी मते घेत विजय मिळवला. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे रविंद्र मुंडे होते. यंदाच्या निवडणूकीत शिवसेनेकडून विनोद घोसाळकर यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी ही लढतही चुरशीची असणार आहे.

महाड विधानसभा मतदारसंघ -

शिवसेनेच्या भरत गोगावले यांनी मागील विधानसभा निवडणुकीत महाड विधानसभा मतदारसंघातून 94 हजार 408 एवढी मते घेत विजय मिळवला. महाड विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस चे माणिक जगताप होते. त्यांना 73 हजार 152 मते मिळाली. यंदाची लढतही या दोन महत्वाच्या उमेदवारांमध्ये होणार आहे.

Intro:Body:

PWPI च्या धैर्यशील पाटील यांनी 64 हजार 616 एवढी मते घेत पेण विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेसच्या रविशेट पाटील यांचा 4 हजार 120 मतांनी पराभव केला होता. यंदा रविशेट पाटील  परत एकदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

अलीबाग विधानसभा मतदारसंघ - 

अलीबाग विधानसभा मतदारसंघातून PWPI च्या सुभाष पाटील यांनी 76 हजार 959 एवढी मते घेत विजय मिळवला. अलीबाग विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे महेंद्र दळवी होते. त्यांना 60 हजार 865 मते मिळाली. आणि त्यांचा 16 हजार 094 मतांनी पराभव झाला. अलीबाग विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर काँग्रेसचे मधुकर ठाकूर, चौथ्या स्थानावर भाजपचे प्रकाश काथे आणि पाचव्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश मोहिते होते. यंदा शिवसेनेकडून महेंद्र दळवी परत एकदा आपले नशीब आजमावत आहेत. अलिबाग विधानसभा मतदारसंघात 1952 पासून फक्त 4 वेळा काँग्रेसचे पुरुष उमेदवार निवडून आले आहेत. या मतदारसंघात 1957 साली आणि आता 2019 च्या निवडणुकीत महिलेला काँग्रेसने संधी दिली आहे. 2019 च्या निवडणुकीसाठी माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र अॅड. प्रवीण ठाकूर, राजेंद्र ठाकूर आणि सून अॅड. श्रद्धा ठाकूर या तिघांनी उमेदवारी काँग्रेसकडे मागितली होती. तर पक्षाने महिला सक्षमीकरणमुळे श्रद्धा ठाकूर यांच्या पारड्यात उमेदवारी टाकली. त्यामुळे राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ - 

मागील विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस च्या अवधूत तटकरे यांनी 61 हजार 038 एवढी मते घेत विजय मिळवला. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना चे रविंद्र मुंडे होते. यंदाच्या निवडणूकीत शिवसेनेकडून विनोद घोसाळकर यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी ही लढतही चुरशीची असणार आहे.

महाड विधानसभा मतदारसंघ - 

शिवसेनेच्या भरत गोगावले यांनी मागील विधानसभा निवडणुकीत महाड विधानसभा मतदारसंघातून 94 हजार 408 एवढी मते घेत विजय मिळवला. महाड विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस चे माणिक जगताप होते. त्यांना 73 हजार 152 मते मिळाली. यंदाची लढतही या दोन महत्वाच्या उमेदवारांमध्ये होणार आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.