ETV Bharat / state

#Cyclone 'निसर्ग' : वादळ परतवणे हे रायगडकरांना नवीन नाही - मुख्यमंत्री

रायगडवर आलेली वादळ परतवून लावण्याचे कसब हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी लीलया निभावले आहे, हा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे वादळे परतवणे हे रायगडकरांना नवीन नाही. रायगडकरांनी या निसर्ग चक्रीवादळात धीराने तोंड दिले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Cm Jadhav Thackeray spoke during pc
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येथील पत्रकार परिषदेत बोलताना.
author img

By

Published : Jun 5, 2020, 6:34 PM IST

रायगड - रायगडवर आलेली वादळ परतवून लावण्याचे कसब हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी लीलया निभावले आहे, हा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे वादळे परतवणे हे रायगडकरांना नवीन नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हावासियांचे कौतुक केले आहे. रायगडकरांनी या निसर्ग चक्रीवादळात धीराने तोंड दिले आहे. म्हणून मी रायगड करांचे कौतुक करण्यास आलो आहे, असे प्रतिपादनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जिल्ह्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने चांगलेच झोडले असल्याने दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिबाग येथे जिल्हा दौरा केला. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात आढावा बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीसाठी तातडीची 100 कोटींची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. तसेच इतर जिल्ह्यालाही तेथील नुकसानीनुसार मदत शासनाकडून दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, रायगडवर आलेली वादळ परतवून लावण्याचे कसब हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी लीलया निभावले आहे, हा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे वादळे परतवणे हे रायगडकरांना नवीन नाही. रायगडकरांनी या निसर्ग चक्रीवादळात धीराने तोंड दिले आहे. म्हणून मी रायगड करांचे कौतुक करण्यास आलो आहे, असे प्रतिपादनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.कोरोना संकटासोबत आता पावसाळ्यात इतर आजारही डोके वर काढणार असल्याने सरकार सरकार जनतेची काळजी घेत आहे. जिल्ह्यातील वीज पुरवठा लवकरच सुरू करण्याचे तसेच नागरिकांच्या घरांचे, मालमत्तेचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याची माहितीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी निधी चौधरी तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाचे केले कौतुक -निसर्ग चक्रीवादळाच्या संभाव्य संकटाला जिल्हा प्रशासन यांनी तातडीने खबरदारीची पावले उचलली होती. वादळाच्या संभाव्य संकटसमयी जिल्ह्यातील 15 हजार नागरिकांना सुस्थळी हलविले असल्याने जीवितहानी कमी झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या नियोजनबद्ध कामामुळे ते कौतुकास्पद आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.