ETV Bharat / state

महाड इमारत दुर्घटना : २६ तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ६५ वर्षीय आजींना वाचवण्यात यश!

26 तास उलटून गेल्यानंतरही मेहरुन्निसा काझी या 65 वर्षीय आजींनी मृत्यूला हरविले आहे. या आजींना एनडीआरएफ पथकाने बाहेर काढले, त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी मोहमद बांगी हा चार वर्षाचा मुलगा ढिगाऱ्याखाली अठरा तास राहून जिवंत राहिल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता या आजींनीही मृत्यूला चकवा दिला आहे...

Raigad Building collapse old woman survives 26 hours under debris
ढिगाऱ्याखाली सव्वीस तासानंतरही आजी राहिल्या जिवंत
author img

By

Published : Aug 25, 2020, 10:57 PM IST

Updated : Aug 26, 2020, 12:30 AM IST

रायगड : तारिक गार्डन इमारत दुर्घटनेमध्ये अजून एक जेष्ठ व्यक्ती जिवंत असल्याचे समोर आले. 26 तास उलटून गेल्यानंतरही मेहरुन्निसा काझी या 65 वर्षीय आजींनी मृत्यूला हरविले आहे. या आजींना एनडीआरएफ पथकाने बाहेर काढले, त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी मोहमद बांगी हा चार वर्षाचा मुलगा ढिगाऱ्याखाली अठरा तास राहून जिवंत राहिल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता या आजींनीही मृत्यूला चकवा दिला आहे.

महाड इमारत दुर्घटना : २६ तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ६५ वर्षीय आजींना वाचवण्यात यश!

मेहरुन्निसा काझी या बी विंग इमारतीत पाचव्या मजल्यावर 504 फ्लॅट मध्ये आपल्या पतीसोबत राहत होत्या. इमारत कोसळताना या दोघांनी वाचण्यासाठी घराबाहेर धाव घेतली. मात्र तोपर्यत इमारत कोसळून दोघेही ढिगाऱ्याखाली अडकले. २६ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये या आजी ढिगाऱ्याखाली जिवंत असल्याचे दिसले. त्यानंतर एनडीआरएफ पथकाने त्यांना सुखरूप बाहेर काढले.

या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अद्यापही बचावकार्य सुरू आहे.

Last Updated : Aug 26, 2020, 12:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.