पेण (रायगड) - ऑल स्पोर्टस असोसिएशन फाॅर डिसेबल्ड आयोजित, अंपग कल्याणकारी संस्था रायगड, दिव्यांग क्रिडा असोसिएशन नवी मुंबई, कांळबादेवी युवक क्रीडा मंडळ गडब यांचे सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरिय दिव्यांग ( पॅरा ) कबड्डी स्पर्धेत रायगड ( ब ) संघाने विजेते पद मिळविले. या स्पर्धेतील अंतिम सामना रायगड ( अ ) विरुध्द रायगड ( ब ) यांच्यात झाला. सुरवाती पासुनच रायगड (ब) संघाने या सानन्यावर आपली पकड ठेवली होती. रायगड (ब) संघाचा अष्टपैलु खेळांडु सहदेव बरडे, आंतरराष्ट्रीय खेळांडु सचिन तांडेल यांनी आक्रमक खेळ करीत संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी केली. तर रायगड (अ) संघाचा आंतरराष्ट्रीय खेळांडु राजेश मोकल, मुकुल खांडे यांनी आपल्या संघाचा पराभव टाळण्याचा प्रयन्त केला, परंतु त्याचे प्रयन्त कमी पडले. अखेर हा सामना रायगड (ब) संघाने जिकुंन राज्य अंजिक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
या स्पर्धेचे उदघाटन - महाराष्ट्र राज्य अपंग कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार, माजी आमदार धैर्यशील पाटील, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रसाद भोईर, सहकार्यवाह आर.एन.म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, सरपंच अर्पणा कोठेकर, माजी उपसरपंच नितिन पाटील, प्रकाश पाटील, कांळबादेवी मंडळाचे अध्यक्ष अंनत पाटील, मंगेश म्हात्रे आदि मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक रायगड (ब) संघ, व्दितीय क्रमांक रायगड (अ) संघ, सर्वोत्कृष्ट खेळांडु सहदेव बोरडे- रायगड ( ब ) संघ, सर्वोत्कृष्ट चढाई राजेश मोकल - रायगड (अ ) संघ यांना पारितोषक देण्यात आले. या स्पर्धेचे पारितोषक वितरण रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह जे.जे.पाटील, सदस्य जनार्दन पाटील, शिवाजी पवार, शिवाजी पाटील, संकेत पाटील, राकेश मोकल आदि मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या स्पर्धेचे समालोचन एस. वाय.लांगी यांनी केले. या स्पर्धेत रायगड ( अ ) , सांगली, नवी मुंबई, नाशिक, रायगड ( ब ), मुंबई, सोलापुर, ठाणे येथील संघ सहभागी झाले होते.