रायगड - केंद्र सरकारचे कृषी, कामगार विधेयक हे शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावणारे असल्याची टीका शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. भाजपाने जनतेची दिशाभूल केली असून त्यापेक्षा इंग्रजांचा काळ बरा होता, असे पाटील म्हणाले.
चालत मंत्रालयावर जाणार
पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील हे जनतेच्या प्रश्नासाठी मंत्रालयावर चालत गेले होते. आता मी देखील या वयात मंत्रालयावर जाण्यासाठी मनाची गाठ बांधली आहे, असे जयंत पाटील म्हणाले. जिल्ह्यात अनेक प्रकल्प येऊ लागले आहेत. या प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेण्यात येत आहेत. मात्र जोपर्यंत स्थानिक तरुणांना नोकरी देण्याची लेखी हमी दिली जात नाही. तोपर्यत जमिनीवर पाऊल ठेऊ दिले जाणार नाही, असा इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे.
या आहेत मागण्या
केंद्र सरकारने शेतकरी कायदे मागे घेणे
तत्कालीन भाजपा सरकारने लागू केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यावी
स्वामिनाथन आयोग लागू करा
कामगार विरोधी कायदे मागे घ्या
राज्य सरकारने राज्यात कामगार कायद्यांची अंमलबजावणी करू नये
वीज विधेयक 2020 त्वरित मागे घ्यावे
कोरोना काळातील वीज बिलं रद्द करावी
लँड सिलिग ऍक्ट कायम ठेवा
रायगडातील सिडको, विमानतळ अंतर्गत घेतलेल्या जमीन मालकांना बारा टक्के भूखंड दिला आहे. तसाच तो रोहा, मुरुड, कर्जत, श्रीवर्धन येथे येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना द्या.
प्रकल्पात स्थानिकांना नोकऱ्या आधी द्या