ETV Bharat / state

वैद्यकीय प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे खोपोली - खालापूरातील खासगी डॉक्टर कर्मचारी कोरोना लसीकरणापासून वंचित - रायगडमधील खासगी डॉक्टरांबद्दल बातमी

सध्या कोरोना वरील लस ही वैद्यकीय सेवा देणाऱ्या व अन्य सेवा देणाऱ्या घटकाला दिली जात आहे. मात्र, वैद्यकीय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे खोपोली - खालापूरातील खासगी डॉक्टर कर्मचारी कोरोना लसीकरणापासून वंचित राहिल्याचे खासगी डॉक्टर वर्गाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

Private medical staff in Khopoli-Khalapur did not get corona vaccine due to mismanagement of medical administration
वैद्यकीय प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे खोपोली - खालापूरातील खासगी डॉक्टर कर्मचारी कोरोना लसीकरणापासून वंचित
author img

By

Published : Feb 26, 2021, 6:54 PM IST

Updated : Feb 26, 2021, 7:54 PM IST

खालापूर (रायगड) - मार्च 2020 पासून कोरोना व्हायरस या महामरीच्या आजाराने थैमान घातले होते. त्या कठीण परिस्थितीत खोपोली व खालापूर मधील खाजगी डॉक्टरानी प्रशासनाच्या आदेशानुसार रुग्णांना उपचार देण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, सध्या कोरोना वरील लस ही वैद्यकीय सेवा देणाऱ्या व अन्य सेवा देणाऱ्या घटकाला दिली जात आहे. मात्र, खोपोली सह खालापूरातील खाजगी डॉक्टर व कर्मचारी वर्गाची स्थानिक वैद्यकीय प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे अद्याप नोंदणीच झालेली नाही. यामुळे कोरोना लसीकरणापासून वंचित राहिल्याने डॉक्टर वर्गाने पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली आहे.

वैद्यकीय प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे खोपोली - खालापूरातील खासगी डॉक्टर कर्मचारी कोरोना लसीकरणापासून वंचित

150 डॉक्टर व 400 हुन अधिक कर्मचारी सेवा पुरवतात खोपोलीत - खालापूरात

कोरोना व्हायरस या आजाराची सुरुवात झाल्यापासून सर्वत्र भयभीत वातावरण झाले होते. त्यामुळे या काळात साधा आजार झाला तरी दवाखान्यात जाण्यासाठी सर्वसामान्य नागरिक घाबरत होतो. या भयावह वातावरणात खोपोली खालापूरातील वैद्यकीय सेवा देणारे खाजगी डॉक्टरांना खोपोली नगर पालीका, तहसील कार्यालय व खालापूर नगरपंचयत शासनाच्या आदेशाचे पालन करून विविध उपाययोजना राबवल्या. खाजगी रुग्णालये ही नागरिकांसाठी खुली ठेवण्यासाठी सूचना केल्याने जीवाची परवा न करता जवळपास 150 डॉक्टर व 400 हुन अधिक कर्मचारी सेवा देत होते. सध्या कोरोनाची लस देण्याचे काम शासनामार्फत सुरू आहे. त्यात शासकीय व खाजगी डॉक्टर, पोलीस प्रशासन व कर्मचारी वर्गाला प्राधान्य देण्यात आले आहे. या सेवा देणआऱ्यांची प्रथम नोंदणी करून नंबर प्रमाणे ही कोरोना लस दिली जात आहे. मात्र, खोपोली व खालापूरातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची स्थानिक शासकीय वैद्यकीय अधिकारी वर्गाच्या निष्काळजी पणामुळे नोंदणीच होऊ शकलेली नाही.

खासगी डॉक्टर वर्गामध्ये नाराजी -

काही दिवसापासून याबाबत चौकशी केली असताना पोर्टल बंद असल्याने सध्या माहिती अपलोड होत नसल्याचे निदर्शनास येत असल्याचे डॉ बी के नागरगोजे, डॉ एच पी दळवी, डॉ श्रीकांत पाटील, डॉ आर एस गडद, डॉ संजय पाटील, डॉ मनोज मिश्रा, डॉ अभिमन्यू चंदनशिवे, डॉ ज्योती पाटील, डॉ सुभाष कटकदौड, डॉ अजय जाधव, डॉ संजय साबणे, डॉ गणेश मोरे यांनी माहिती देताना सांगितले. दोन महिन्यापासूनच वरिष्ठ पातळीवरून स्थानिक प्रशासनाला सांगितले असल्याचे विचारणा करीत असताना समजले असल्याचे म्हणणे या पत्रकार परिषदेत माहीती डॉक्टर वर्गाने दिली आहे. मात्र स्थानिक प्रशासनाकडू 24 फेब्रुवारीला लसीकरणासाठी पत्र प्राप्त झाल्याने ही बाब समोर आली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या हजलर्गी पणामुळेच खोपोली खालापूरातील वैद्यकीय सेवा देणारा महत्वाचा घटक वंचित राहिल्या चा आरोप डॉक्टरानी केला असून त्याची चौकशी होऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Last Updated : Feb 26, 2021, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.