ETV Bharat / state

प्रकाश आंबेडकरांनी महाआघाडीचे नेतृत्व करावे - लक्ष्मण माने - भाजप

प्रकाश आंबेडकरांनी भाजप-शिवसेनेला मदत होणार नाही, अशी भूमिका घ्यावी, ते जर त्यांना मान्य असेल तर मी त्यांच्यासोबत राहीन. मात्र, त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर मी बाहेर पडेन, असे लक्ष्मण माने यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकरांनी महाआघाडीचे नेतृत्व करावे - लक्ष्मण माने
author img

By

Published : Jul 7, 2019, 2:46 PM IST

Updated : Jul 7, 2019, 5:12 PM IST

रायगड - भाजप- शिवसेना सत्तेला राज्याच्या सत्तेतून बाजूला सारण्यासाठी सर्व पुरोगामी पक्ष व संघटनांच्या महाआघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न मी करत आहे. या सर्व पुरोगामी संघटनांचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी करावे, अशी माझी विनंती आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आता हवेत न राहता जमिनीवर यावे, त्यांनी आमच्यासोबत यावे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी केले आहे.

त्याबरोबरच प्रकाश आंबेडकरांनी भाजप शिवसेनेला मदत होणार नाही, अशी भूमिका घ्यावी, ते जर त्यांना मान्य असेल तर मी त्यांच्यासोबत राहीन. मात्र, त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर मी बाहेर पडेन, असे लक्ष्मण माने यांनी सांगितले. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मण माने हे अलिबाग मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली.

प्रकाश आंबेडकरांनी महाआघाडीचे नेतृत्व करावे - लक्ष्मण माने

यावेळी माने म्हणाले, भाजप शिवसेना पक्षाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी पुरोगामी पक्ष व संघटनेने एकत्र येणे गरजेचे आहे. यासाठी शेकापने या आघाडीत सामील व्हावे, अशी भूमिका असून त्याला जयंत पाटील यांनी दुजोरा दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता हवेत न राहता जमिनीवर येऊन आपल्या पराभवाची कारणे शोधली पाहिजे. त्यांनीही सोबत येणे गरजेचे आहे. तसेच सर्व आंबेडकरी संघटनांशी बोलणी सुरू आहेत. आमची मते जरी जास्त असली तरी त्यांची विभागणी होत आहे. त्यामुळे पुरोगामी संघटनेने भाजप शिवसेनेला टक्कर देण्यासाठी एकत्र येण्याची गरजेचे आहे. त्यामध्ये मला यश येईल, असे माने यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिल्याबाबत विचारले असता, मी राजीनामा दिला आहे. तो प्रकाश आंबेडकर यांनी स्वीकारलेला नाही, असे माने यांनी सांगितले.

Intro:भाजप शिवसेना युतीला सत्तेतून बाजूला सारण्यासाठी पुरोगामी पक्षाने एकत्र यावे

लक्ष्मण माने यांनी अलिबाग येथे व्यक्त केली भूमिका

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने हवेत न राहता जमिनीवर यावे

प्रकाश आंबेडकर यांनी महाघाडीचे नेतृत्व करावे

रायगड : भाजप शिवसेना सत्तेला राज्याच्या सत्तेतून बाजूला सारण्यासाठी सर्व पुरोगामी पक्ष व संघटना याची महाआघाडीची मोट बांधण्याचा मी प्रयत्न करीत आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आता हवेत न राहता जमिनीवर येऊन आमच्यासोबत यावे व प्रकाश आंबेडकर यांनी भाजप शिवसेनेला मदत होणार नाही अशी भूमिका घेऊन सर्व पक्षीय पुरोगामी महाआघाडीत यावे अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी अलिबाग मध्ये मांडली.

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मण माने हे अलिबाग मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी सुसंवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली.Body:भाजप शिवसेना पक्षाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी पुरोगामी पक्ष व संघटनेने एकत्र येणे गरजेचे आहे. यासाठी शेकापने या आघाडीत सामील व्हावे अशी भूमिका असून त्याला जयंत पाटील यांनी दुजोरा दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता हवेत न राहता जमिनीवर येऊन आपल्या पराभवाची कारणे शोधली पाहिजे. त्यांनीही सोबत येणे गरजेचे आहे. तसेच सर्व भीम संघटनांशी बोलणी सुरू आहेत. आमची मते जरी जास्त असली तरी त्याची विभागणी होत आहे. त्यामुळे पुरोगामी संघटनेने भाजप शिवसेनेला टक्कर देण्यासाठी एकत्र येण्याची गरजेचे आहे. त्याला मला यश येईल असे माने यांनी सांगितले.Conclusion:वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिल्याबाबत विचारले असता, मी राजीनामा दिला आहे. तो प्रकाश आंबेडकर यांनी स्वीकारलेला नाही. मात्र सर्व पुरोगामी संघटनेना एकत्र घेण्याची माझी भूमिका असून त्याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी करावे. अशी माझी विनंती आहे आणि ती जर मान्य केली तर मी त्याच्यासोबत आहे. मात्र त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर मी बाहेर पडेल असे लक्ष्मण माने यांनी सांगितले.

फेसबुकवरही आपण आपली भूमिका स्पष्ट केली होती याबाबत माने म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे 288 जागा लढविण्याबाबत ठाम आहेत. याबाबत मी जास्त बोलू शकत नाही असे मत त्यांनी मांडले.
Last Updated : Jul 7, 2019, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.