खालापूर (रायगड) - खालापूर नगरपंचायत हद्दीतील काही सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाली असल्याने सुलभ शौचालय गेले कित्येक महिने बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक 1 हा परिसर लोकसंख्येने गजबजलेला असताना शौचालयाच्या दुरावस्थेने नागरिकांना गैरसोयीचे होत आहे. नागरिकांची अडचण होत असतानाही पालिकेने दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत असून प्रशासनाने सार्वजनिक शौचालयाच्या डागडुजीकडे पुर्णतः दुर्लक्ष केल्याने, या शौचालायाची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.
खालापूर शहराचा सर्वागीण विकास होत असताना खालापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून असंख्य विकास कामे मार्गी लागली असुन अनेक प्रलंबित विकास कामाचे काम प्रगतीपथावर आहेत. मात्र, काही मार्गी लागलेल्या कामांची प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दयनीय अवस्था बनल्याचे पाहायाला मिळत आहे. नगरपंचायत प्रशासनाने प्रत्येक प्रभागात सार्वजनिक सुलभ शौचालय बांधून नागरिकांना चांगली सुविधा करून दिली होती. मात्र, ही सुविधा काही काळानंतर आपोआप कोलमडली पाहायला मिळत आहे. प्रभाग 1 मधील सार्वजनिक सुलभ शौचालयाची सद्यस्थितीला अवस्था पाहता भयानक बनल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिक प्रशासनाच्या गळथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.
हे शौचालय पाण्याविना सुखेसुखे पडले असून भिंतीला तडे पडल्याने लाखों रुपयाचा निधी वाया गेल्याची प्रतिक्रिया खालापुरकर व्यक्त करत आहेत. एका बाजूला नगरपंचायत विकास कामाचे मोठ्या थाटामाट्यात उघ्दाटन करत असून दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या सेवेत असणाऱ्या काही कामांकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहेत.