ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीनंतर रायगडमधील राजकीय स्थिती बदलणार? - रायगडमधील जिल्हा परिषद निवडणुका

रायगड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, काँग्रेस अशी सत्ता आहे. शिवसेना, भाजप हे विरोधी बाकावर बसलेले आहेत. मात्र, विधानसभेनंतर बदललेली राजकीय परिस्थिती जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चमत्कार घडवेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर रायगडातील राजकीय स्थिती बदलणार?
author img

By

Published : Oct 31, 2019, 5:57 PM IST

रायगड - विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले असून, आघाडीला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शेकापला एकही जागा मिळवता आली नाही, तर काँग्रेस पक्षाचीही तीच अवस्था झाली आहे. रायगडमधील या बदललेल्या राजकीय परिस्थितीत आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील चित्र बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

एक महिन्यांनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुती कोणता चमत्कार करून जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी प्रयत्नशील राहील? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अलिबाग, महाड, कर्जत (शिवसेना), पेण, पनवेल (भाजप), उरण ( अपक्ष), श्रीवर्धन ( राष्ट्रवादी काँग्रेस) या ठिकाणी राजकीय पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीचे प्राबल्य वाढले आहे. रायगड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, काँग्रेस अशी सत्ता आहे. शिवसेना, भाजप हे विरोधी बाकावर बसलेले आहेत. अडीच वर्षे अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित झालेल्या आमदार अदिती तटकरे यांच्याकडे आहे. पुढील अडीच वर्षे हे शेकापकडे अशी बोलणी आघाडीमध्ये झालेली आहे. आघाडीकडे संख्याबळ असल्याने अध्यक्ष हा आघाडीचाच होऊ शकतो. मात्र, विधानसभेनंतर बदललेली राजकीय परिस्थिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चमत्कार घडवेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेकाप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 12, काँग्रेस 3, भाजप 3 असे एकूण 59 सदस्य संख्या आहे. आघाडीचे 38 तर महायुतीचे 21, असे संख्याबळ आहे. त्यामुळे अध्यक्ष हा आघाडीचाच बसण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी शिवसेना भाजप काय खेळी खेळतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बदलण्याची शक्यता

जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चमत्कार घडण्याची शक्यता ?

रायगड : विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले असून आघाडीला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शेकापला एकाही जागेवर यश मिळविता आलेले नाही तर काँग्रेस पक्षाचीही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. रायगडातील या बदललेल्या राजकीय परिस्थितीत आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील चित्र बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एक महिन्यांनी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुती कोणता चमत्कार करून जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी शक्यता राजकीय वर्तुळात निर्माण झालेली आहे.

Body:अलिबाग, महाड, कर्जत (शिवसेना), पेण, पनवेल (भाजप), उरण ( अपक्ष), श्रीवर्धन ( राष्ट्रवादी काँग्रेस) अशा जागा राजकीय पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीचे प्राबल्य वाढले आहे. रायगड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, काँग्रेस अशी सत्ता आहे. शिवसेना, भाजप हे विरोधी बाकावर बसलेले आहेत. अडीच वर्षे अध्यक्ष पद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित झालेल्या आमदार अदिती तटकरे यांच्याकडे आहे. पुढील अडीच वर्षे हे शेकापकडे अशी बोलणी आघाडी मध्ये झालेली आहे. आघाडी कडे संख्याबळ असल्याने अध्यक्ष हा आघाडीचाच होऊ शकतो. मात्र विधानसभेनंतर बदललेली राजकीय परिस्थिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चमत्कार घडवेल का हा प्रश्न राजकीय वर्तुळात पडला आहे.Conclusion:शेकाप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 12, काँग्रेस 3, भाजपा 3 असे एकूण 59 सदस्य संख्या आहे. आघडीचे 38 तर महायुतीचे 21 असे संख्याबळ आहे. त्यामुळे अध्यक्ष हा आघाडीचाच बसण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्याचीमिनी विधानसभाच असल्याने ती काबीज करण्यासाठी मात्र त्यातूनही शिवसेना भाजप जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी काय खेळी खेळतात का हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.