ETV Bharat / state

खबरदार..! अनावश्यक बाहेर पडाल तर होणार कारवाईसह वाहन जप्ती - वाहतूक पोलीस रायगड

कोरोना विषाणूची लागण आतापर्यंत जिल्ह्यातील सात जणांना झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडू नका, गर्दी करू नका, असे आवाहन वारंवार जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन करीत आहे. मात्र, याकडे नागरिक कानाडोळा करताना दिसत आहेत. 30 मार्चपासून रस्त्यावर खाजगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

police-will-did-action-if-someone-unnecessary-exit-home
अनावश्यक बाहेर पडाल तर होणार कारवाईसह वाहन जप्ती
author img

By

Published : Apr 2, 2020, 4:23 PM IST

रायगड- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र, काही नागरिक घराबाहेर येत आहेत. त्यामुळे खासगी वाहनांना रस्त्यावर फिरविण्यास जिल्हाधिकारी यांनी बंदी केलेली आहे. असे असताना नागरिक वाहने घेऊन रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करून त्यांची वाहने जप्त करण्यात येत आहेत.

अनावश्यक बाहेर पडाल तर होणार कारवाईसह वाहन जप्ती

हेही वाचा- COVID 19 : एमी पुरस्कार विजेत्या गायकाचं कोरोनामुळे निधन

कोरोना विषाणूची लागण आतापर्यंत जिल्ह्यातील सात जणांना झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडू नका, गर्दी करू नका, असे आवाहन वारंवार जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन करीत आहे. मात्र, याकडे नागरिक कानाडोळा करताना दिसत आहेत. 30 मार्चपासून रस्त्यावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र, तरीही नागरिक अनावश्यक बाहेर पडत आहेत.

जिल्हा पोलिसांनी गुरुवारपासून रस्त्यावर खाजगी दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन शहरात फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यात अलिबाग शहरात येणाऱ्या शेकडो गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. वाहने जप्त केल्याने वाहन मालकांना चालत आपले घर गाठावे लागले आहे.

दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज नववा दिवस आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.