ETV Bharat / state

तांबोळी यांचा अपघात की आत्महत्या? - Raigad Latest News

मुरुड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद तांबोळी यांचा मृतदेह सिमरन मोटर्सच्या मागील बाजूस असलेल्या रेल्वे रुळावर सापडला. त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

प्रभारी पोलिस निरीक्षक तांबोळी
author img

By

Published : Nov 2, 2019, 9:53 PM IST

Updated : Nov 2, 2019, 10:18 PM IST

रायगड - मुरुड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद तांबोळी यांचा मृतदेह सिमरन मोटर्सच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रेल्वे रुळावर सापडला. त्यांचा अपघातात होता की आत्महत्या अथवा घातपात, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ते खांदा कॉलनी येथे वास्तव्यास होते. आजारपणामुळे ते खांदेश्वर येथे आपल्या घरी गेले होते.

आज 2 ऑक्टोबरला दुपारी साडे चारच्या सुमारास एका रेल्वे प्रवाशाने पनवेल खांदेश्वर दरम्यान सिमरन मोटर्सच्या मागच्या रेल्वे रुळावर एका इसमाचा मृतदेह पडल्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केसरकर आणि सहकाऱ्यांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद तांबोळी यांचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले.

विनोद तांबोळी हे रायगड जिल्ह्यातील मुरुड पोलीस ठाण्याचे प्रमुख अधिकारी होते. आजारी असल्याचे कारण देत ते शुक्रवारपासून दोन दिवसाच्या रजेवर गेले होते, अशी माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिली. तांबोळी यांना रेल्वेची धडक बसल्याने त्यांना अपघात झाला असल्याचे रेल्वे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले असले तरी आजारी असताना तांबोळी तिथे का गेले हा प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातून तांबोळी यांनी आत्महत्या केली असावी असाही मतप्रवाह सुरू झाला आहे. दुसरीकडे त्यांच्या घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे.

तांबोळी हे 2011 च्या दरम्यान परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्तांच्या पनवेल कार्यालयात पोलीस हवालदार होते. त्यानंतर खाते अंतर्गत परीक्षा देवून सहाय्यक पोलीस निरीक्षक पदापर्यंत पोहचले होते. सध्या ते मुरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. पनवेल जिल्हा उपरुग्णालयाचे डॉ. फालके यांनी शवविश्चेदन केले. पुढील तपास पनवेल रेल्वे पोलीस करत आहेत.

Intro:सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद तांबोळी यांचा रेल्वे अपघातात मृत्यू

मुरुड पोलिस ठाण्यात होते वरिष्ठ पोलिस निरीक्षक

सिमरन मोटर्सच्या मागे रेल्वे रुळावर सापडला मृतदेह

अपघात की आत्महत्या ?

रायगड : मुरुड पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद तांबोळी यांचा मृतदेह सिमरन मोटर्सच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रेल्वे रुळावर सापडला. त्यांचा अपघातात होता की आत्महत्या अथवा घातपात, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ते खांदा कॉलनी येथे वास्तव्यास होते. आजार पणामुळे ते खांदेश्वर येथे आपल्या घरी गेले होते.Body:आज 2 ऑक्टोबर रोजी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास एका रेल्वे प्रवाशाने पनवेल खांदेश्वर दरम्यान सिमरन मोटर्सच्या मागच्या रेल्वे रुळावर एका इसमाचा मृतदेह पडल्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक केसरकर आणि सहकाऱ्यांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी एका इसमाचा मृतदेह पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद तांबोळी यांचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. Conclusion:विनोद तांबोळी हे रायगड जिल्ह्यातील मुरुड पोलिस ठाण्याचे प्रमुख अधिकारी होते. आजारी असल्याचे कारण देत ते कालपासून दोन दिवसाच्या रजेवर गेले होते, अशी माहिती रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी बोलताना दिली. तांबोळी यांना रेल्वेची धडक बसल्याने त्यांना अपघात झाला असल्याचे रेल्वे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले असले तरी आजारी असताना तांबोळी तिथे का गेले हा प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातून तांबोळी यांनी आत्महत्या केली असावी असाही मतप्रवाह सुरू झाला आहे. तर दुसरीकडे त्यांच्या घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे.

तांबोळी हे 2011 च्या दरम्यान परिमंडळ 2 चे पोलिस उपायुक्तांच्या पनवेल कार्यालयात पोलिस हवालदार होते. त्यानंतर खाते अंतर्गत परीक्षा देवून सहाय्यक पोलिस निरीक्षक पदापर्यंत पोहचले होते. सध्या ते मुरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.
पनवेल जिल्हा उपरुग्णालयाचे डॉ. फालके यांनी शवविश्चेदन केले. पुढील तपास पनवेल रेल्वे पोलिस करत आहेत.

सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांच्या आत्महत्येनंतर पोलीस खात्यातील ही दुपारी5 घटना असल्याने जिल्हा पोलीस दल सध्या चर्चेत आले आहे.
Last Updated : Nov 2, 2019, 10:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.