रायगड - पंतप्रधान नरेंद्र यांनी कोरोना विषाणू ससंर्ग रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. या जनता कर्फ्यूला जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला असून सर्व रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. वाहनांच्या व नागरिकांच्या वर्दळीपासून रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. रस्त्यावर पोलीस आणि अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी पाहायला मिळत आहे.
कोरोना विषाणू हा संसर्गजन्य असल्याने गर्दीची ठिकाणे टाळणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील गर्दीची सर्व ठिकाणे बंद करण्यात आलेली आहेत. रविवार 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला असून नागरिक रस्त्यावर न येता घरात बसून आहेत. तर, रोज धावणारे रस्ते आज पूर्णतः निर्मनुष्य व वाहन विरहित पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा - कोरोना : रायगड जिल्ह्यातील बाजारपेठा बंद; नागरिकांची तुरळक गर्दी, अत्यावश्यक सेवा मात्र सुरळीत
यासोबतच, मुंबई गोवा महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगतिमार्ग तसेच अंतर्गत रस्तेही आज थांबले आहेत. जनता कर्फ्यूच्या निमित्ताने पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहन रायगडकरांना केले होते. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा सुरू असून इतर सर्व दुकाने बंद करण्यात आलेली आहेत.
हेही वाचा - कोरोना कहर: निगराणीखाली ठेवलेल्या अलिबागमधील एकाला हलवले विलगीकरण कक्षात