ETV Bharat / state

तालुक्यात 5 नव्या रुग्णांसह आकडा 11वर, नागरिकांकडून 'जनता कर्फ्यू'ची मागणी - पेण कोरोना न्यूज

पेण तालुक्यात एका दिवसात 5 रुग्णांची वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरेदीच्या नावाने वाढणाऱ्या गर्दीमुळे शहरात व तालुक्यात कमीत कमी 5 दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

पेण न्यूज
पेण न्यूज
author img

By

Published : May 29, 2020, 7:46 PM IST

पेण (रायगड) - शहरात सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका कोरोना रुग्णाची भर पडली आहे. संपूर्ण पेण तालुक्यात आज एकाच वेळी 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. आता तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांनी दुहेरी आकडा गाठला आहे.

गुरुवारपर्यंत तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण सापडले होते. मात्र, आज एकाच वेळी 5 रुग्ण आढळल्याने आता तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 11वर जाऊन पोहोचला आहे. शहरातील कारमेल हायस्कूलजवळील एका सोसायटीमध्ये एक 28 वर्षीय महिला रुग्ण तसेच तालुक्यातील चोळे या गावी 2 महिला व 1 पुरुष व एक 13 वर्षाचा मुलगा असे एकूण 5 पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळले आहेत. हे सर्व रुग्ण मुंबईहून तालुक्यात आले होते. दरम्यान, पेण नगरपरिषदेने कारमेल शाळेजवळील त्या सोसायटीमध्ये सॅनिटायझेशन केले आहे.

या 5 रुग्णांपैकी एका रुग्णाला पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, 4 रुग्णांना पनवेल येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शहरातही दुसरा रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरेदीच्या नावाने वाढणाऱ्या गर्दीमुळे शहरात व तालुक्यात कमीत कमी 5 दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.