रायगड - सर्वत्र संचारबंदी लागू असताना अलिबागमधील भिलजीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आदेशाचे उल्लंघन करून पूजा-आरतीसाठी 100 हून अधिक गावकरी जमले होते. गावकऱ्यांना एकत्र येण्यास प्रोत्साहन देणारे पोलीस पाटील, मंदिराचे पुजारी, सचिव यांच्यासह 25 जणांवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेनंतर नागरिक अजूनही कोरोनाबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी बंद करण्यात आली आहेत. गर्दी टाळण्याचे शासनाचे आदेश असताना देखील भिलजी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सभामंडपात शनिवारी (18 एप्रिल) सायंकाळी १०० ते १२५ ग्रामस्थ जमले होते. सव्वासहा वाजण्याच्या सुमारास पुजा- आरती देखील करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी न घेता गावचे पोलीस पाटील अनंत पुनकर, मंदीराचे पुजारी अनंत ठाकूर, मंदिराचे सचिव दत्तात्रेय भोईर यांनी भिलजी गावातील लोकांना एकत्र जमवल्याप्रकरणी या तिघांसह 25 जणांवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भादंवि कलम 143, 269, 270, 188 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51(ब), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(3)/135, साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 2, 3, 4 तसेच महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम 2020 चे नियम क्र. 11 चे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
आदेश झुगारून अलिबागमध्ये 'आरती'; मंदिराच्या पुजाऱ्यासह २५ जणांवर गुन्हा - mumbai lockdown news
सर्वत्र संचारबंदी लागू असताना अलिबागमधील भिलजीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आदेशाचे उल्लंघन करून पूजा-आरतीसाठी 100 हून अधिक गावकरी जमले होते. गावकऱ्यांना एकत्र येण्यास प्रोत्साहन देणारे पोलीस पाटील, मंदिराचे पुजारी, सचिव यांच्यासह 25 जणांवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.