ETV Bharat / state

पार्थ पवारांची ती 'भागम भाग' केवळ एक स्टंट - पनवेल

मात्र, सभा नसतानाही पार्थ पवारांची दिसत असलेली ही पळापळ केवळ एक स्टंट असल्याचे समोर आले आहे.

पार्थ पवारांची ती 'भागम भाग' केवळ एक स्टंट
author img

By

Published : Apr 1, 2019, 4:26 PM IST

पनवेल - मावळ मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार सध्या पनवेल दौऱ्यावर आहेत. नुकताच ते रस्त्यावरून धावत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सभेसाठी उशीर झाला म्हणून पार्थ पवार सभा ठिकाणी धावत पळत जात असल्याचे सांगून हा व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, सभा नसतानाही पार्थ पवारांची दिसत असलेली ही पळापळ केवळ एक स्टंट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पहिल्या भाषणाच्या वेळी अडखळत केलेल्या भाषणावरून ट्रोल झालेले पार्थ पवार पुन्हा एकदा ट्रोलच्या जाळ्यात अडकले आहेत.

मावळ मतदारसंघात मतदारपर्यंत पोहोचण्यासाठी आघाडीचे उमेदवार पार्थ पवार सध्या पनवेलमधल्या गल्लीत फिरताना दिसून येत आहेत. रविवारी रात्री ते पनवेलमधील मोहल्ला परिसरात प्रचारासाठी येणार होते. यावेळी ते मोहल्ला परिसरातील नागरिकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेणार होते. सभेसाठी उशीर झाला म्हणून थेट रस्त्यावरून धावत पळत सभेच्या ठिकाणी जतानाचा पार्थ पवारांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु ज्या परिसरात पार्थ पवार सभेसाठी जाणार होते, तेथे कोणतीही सभा आयोजित करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.

पार्थ पवारांची ती 'भागम भाग' केवळ एक स्टंट

त्याचप्रमाणे पार्थ पवार यांनी केलेल्या लोकल प्रवासावरही प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत. काल पार्थ यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेता याव्या यासाठी सकाळच्या वेळी सीएसटी ते पनवेल, असा लोकल प्रवास केला. परंतु पनवेलमधला नोकरदार वर्ग हा सकाळच्या वेळेला आपल्या कामावर जाण्यासाठी पनवेल ते सीएसटी असा प्रवास करतात. मग पार्थ पवार यांनी सकाळच्या वेळेला सीएसटी ते पनवेल, असा उलटा प्रवास करून किती पनवेलकरांच्या समस्या जाणून घेतल्या, असा प्रश्नही उपस्थित होताना दिसून येत आहे.

थोडक्यात काय तर, यापूर्वीही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील निवडणूक काळात रेल्वेने प्रवास करून अनेक स्टंट केलेत. त्यांच्याच पाऊलवर पाऊल ठेवत पार्थ हे देखील स्टंट करताना दिसून येत आहेत.

Intro:पनवेल

मावळ मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार सध्या पनवेल दौऱ्यावर असून नुकताच ते रस्त्यावरून धावत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. सभेसाठी उशीर झाला म्हणून पार्थ पवार सभा ठिकाणी धावत पळत जात असल्याच सांगून हा व्हिडीओ शेअर केला होता. परंतु सभा नसतानाही पार्थ पवारांनी दिसत असलेली ही पळापळ केवळ एक स्टंट असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पहिल्या भाषणाच्या वेळी अडखळत केलेल्या भाषणावरून ट्रोल झालेले पार्थ पवार पुन्हा एकदा ट्रोलच्या जाळ्यात अडकले आहेत.

Body:मावळ मतदारसंघात मतदारपर्यंत पोहोचण्यासाठी आघाडीचे उमेदवार पार्थ पवार सध्या पनवेलमधल्या गल्लोगली फिरताना दिसून येत आहेत. काल रात्री ते पनवेलमधील मोहल्ला परिसरात प्रचारासाठी येणार होते. यावेळी ते मोहल्ला परिसरातील नागरिकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेणार होते. सभेसाठी उशीर झाला म्हणून थेट रस्त्यावरून धावत पळत सभेच्या ठिकाणी जतानाचा पार्थ पवारांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. परंतु ज्या परीसरात पार्थ पवार काल रात्री जाणार होते त्या परिसरात कुठलीही सभा आयोजित करण्यात आली नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे कुठलीही सभा नसताना पार्थ पवारांची झालेली ही पळापळ पाहून पार्थ पवार पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत.

त्याचप्रमाणे पार्थ पवार यांनी काल केलेल्या लोकल प्रवासावर ही प्रश्न चिन्ह उभे झाले आहेत. काल पार्थ पवार यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेता यावेत यासाठी सकाळच्या वेळेला सीएसटी ते पनवेल असा लोकल प्रवास केला.परंतु पनवेलमधला नोकरदार वर्ग हा सकाळच्या वेळेला आपल्या कामावर जाण्यासाठी पनवेल ते सीएसटी असा प्रवास करतात. मग पार्थ पवार यांनी सकाळच्या वेळेला सीएसटी ते पनवेल असा उलटा प्रवास करून किती पनवेलकरांच्या समस्यां जाणून घेतल्या, असा प्रश्न ही उपस्थित होताना दिसून येत आहे.

Conclusion:थोडक्यात काय तर, यापूर्वी ही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील निवडणूक काळात रेल्वेने प्रवास करून अनेक स्टंट केलेत. त्यांच्याच पाऊलवर पाऊल ठेवत आता पार्थ पवार हे देखील असे स्टंट करताना दिसून येत आहेत. परंतु त्यांची ही स्टंटबाजी पार्थ पवार यांच्या ट्रोलसाठी कारण बनत चालले आहेत.

-----

बातमीसाठी आधी एफटीपी केलेला व्हिडीओ वापरणे. व्हिडिओचा slug खालीलप्रमाणे

MH_Panvel_ParthaPawar_Stunt_AV_28March2019_PramilaPawar
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.