ETV Bharat / state

Dr. Himmatrao Bawaskar on ETV Bharat : विंचूदंशावरील औषधीची निर्मिती, हेल्दी इंडियाची व्याख्या याबाबत काय म्हणाले पद्मश्री हिम्मतराव बावस्कर? - Padma Shri Dr. Himmatrao Bawaskar ETV Bharat

वैद्यकीय क्षेत्रात तब्बल 40 वर्ष योगदान देणाऱ्या डॉ. हिम्मतराव बावस्कर यांना भारत सरकारने नुकताच पद्मश्री ( Padma Shri Dr. Himmatrao Bawaskar ) पुरस्कार जाहीर केला. ईटीव्ही भारतने त्यांची विशेष मुलाखत घेतली. ( Padma Shri Dr. Himmatrao Bawaskar ETV Bharat Special Interview ) या मुलाखतीत त्यांनी विंचू दंशावरील औषधीच्या निर्मितीचा प्रवास उलगडला.

Padma Shri Dr. Himmatrao Bawaskar Special Interview with ETV Bharat
पद्मश्री हिम्मतराव बावस्कर ईटीव्ही भारत विशेष मुलाखत
author img

By

Published : Feb 8, 2022, 8:01 AM IST

Updated : Feb 8, 2022, 8:12 PM IST

हैदराबाद - वैद्यकीय क्षेत्रात तब्बल 40 वर्ष योगदान देणाऱ्या डॉ. हिम्मतराव बावस्कर यांना भारत सरकारने नुकताच पद्मश्री ( Padma Shri Dr. Himmatrao Bawaskar ) पुरस्कार जाहीर केला. विंचूदंशावरील त्यांनी शोधलेल्या औषधाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. ईटीव्ही भारतने त्यांची विशेष मुलाखत घेतली. ( Padma Shri Dr. Himmatrao Bawaskar ETV Bharat Special Interview ) या मुलाखतीत त्यांनी विंचू दंशावरील औषधीच्या निर्मितीचा प्रवास तसेच शिक्षणाचं महत्त्व काय आहे, Healthy Indiaची त्यांची व्याख्या काय, या मुद्द्यांवर चर्चा केली. ( Dr. Himmatrao Bawaskar on ETV Bharat )

ईटीव्ही भारतने पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांची घेतलेली मुलाखत.
  • प्रश्न - वैद्यकीय क्षेत्रात जवळपास 40 वर्ष तुम्ही आपली सेवा दिलीत. त्यानंतर तुम्हाला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. कसं वाटतंय?

उत्तर - माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला हा पुरस्कार जाहीर झाला. 40 वर्ष खूप कष्ट करुन, संशोधन करुन, अभ्यास करुन, रुग्ण तपासून, निरनिराळ्या औषधांच्या प्रयोग करुन विंचूदंशाच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले. 40 टक्के मृत्यूचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी झाले. माझ्या उपचाराने रुग्ण बरे झाला, त्याचदिवशी मला पद्मश्री मिळाला होता. पण त्यावर शिक्कामोर्तब आत्ता झाले आहे.

  • प्रश्न - या औषधाच्या निर्मितीमागच्या प्रवासाबद्दल सांगाल.

उत्तर - 1976मध्ये एमबीबीएस झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बिरवाडी या अगदी 4 हजार रुग्णसंख्येच्या गावात रुजू झालो. येथे विंचू चावल्यावर मृत्यूचे प्रमाण खूप आहे, असे सांगण्यात आले. मला एमबीबीएसला असताना विंचू चावल्यानंतर मृत्यू होतो, असे कधीच सांगण्यात आले नव्हते. 23 ऑगस्ट 1976 या दिवशी त्याठिकाणी रुजू झालो त्यादिवशी तेथील कंपाऊंडवरचा 16 वर्षाचा मुलगा विंचू चावल्याने 10 दिवसांपूर्वी मरण पावला होता. या घटनेबाबत कंपाऊंडरने मला सांगितले. हे रुग्ण हार्ट फेल होऊन मरतात. यासंबंधीची चर्चा केल्यानंतर याच्या केसेस मी तयार केल्या. त्यांच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब याबाबत अभ्यास केला. विंचू चावल्यानंतर दम लागतो. शरीरामधील बीपी वाढतो. यानंतर हृदयावरील ताण वाढतो. हृदय कमकुवत होते. हृदयात रक्त साचतं. ते पुढे Lungsमध्ये जातं. यानंतर Lungs हिडीमा होतो. यानंतर ऑक्सिजन भेटत नाही. म्हणून रुग्णाला दम लागतो. रुग्णाला खोकला येतो. अशा रुग्णाचा कोकणात मृत्यूदर 40 टक्के होता. 1961ला पी.एम. मुंडले या भागातील कॅप्टन होते. त्यांनी 76 पैकी 23 मृत्यूंचा अहवाल ब्रिटिश जर्नलमध्ये दिला होता. तो अहवाल मी पाहिला. मी गेलो तेव्हा अशी परिस्थिती होती कोणीही रुग्णाला दाखल करुन घेत नव्हते. कारण उलटी झाल्यावर रुग्णाचा मृत्यू होणार अशी भीती वाटायची. अनेकदा तर रुग्ण जिवंत असतानाच लोक अंत्यसंस्काराची तयार करायचे, रुग्णाची अवस्था पाहून त्यांना वाटायचं की हा आता दगावणार आहे. त्यामुळे In this area, Death was taken as fact of life.

मी रुजू झाल्यावर दर दिवसाआड एक मृतदेह किंवा एक गंभीर रुग्ण यायचा. मी घाबरुन जायचो. कोणीही डॉक्टर त्यावेळी रेकॉर्ड ठेवत नव्हते. ते म्हणायचे, रक्ताचं पाणी होतं आणि रुग्ण दगावतो. विशेष म्हणजे या काळात अशा रुग्णाचं बीपी घेतला नाही. त्यांना वाटायचं घाम येतो म्हणजे, Hypotension असेल. मात्र, उलटं झालं. मी आल्यानंतर आधी बीपी चेक केला तेव्हा तो वाढलेला असायचा. या बाबत सर्व रेकॉर्ड ठेवून मी लॅन्सेटमध्ये पब्लिश केले. तिथे गेल्यावर असं वाटलं की एमबीबीएसचं ज्ञान कमी पडत होतं. त्यासाठी मी एमडी करायला पुण्याला गेलो.

एमडी करत असताना Reflectory Heart Treatement हा मोठा विषय होता. मी एमडी झाल्यावर स्वत:च्या खर्चाने कोकणात पोलादपूरला बदली करुन घेतली. हा 1983 चा काळ होता. त्यावेळेला Cardiac Monitor आणि इतर अत्याधुनिक वैद्यकीय साधनं नव्हती. ऑक्सिजनही रुटीन होता. त्यामुळे या रुग्णाला sodium nitroprusside लावायची कोणी हिंमत करत नव्हता. याचा एक थेंब जरी टाकला तरी 30-40 रक्तदाब कमी होत होता. इतकी जास्त याची तीव्रता होती. त्यात अशा रुग्णाचा रक्तदाब आधीच कमी झालेला असतो. sodium nitroprusside आम्ही पोलादपुरला आणलं. एक दिवशी आठ वर्षाचा मुलगा आला. त्यावेळी असं होतं की या रुग्णाला दम लागला किंवा शरीर थंड पडला तर त्याचा मृत्यू होणार, असा समज होता. sodium nitroprusside लावण्याबाबत त्याच्या वडिलांची परवानगी घेतली. ते द्रव्य आम्ही त्याला लावलं. सुरुवातीला त्याचा रक्तदाब 60-70 इतका होता. हृदयदाब 100 इतका होता. त्याला दम लागला होता. त्याला खोकलाही होता. खोकल्यातून रक्त बाहेर पडत होते. त्याच्यावर उपचार करताना अत्याधुनिक साधने नसल्यामुळे तारेवरची कसरत होत होती. मात्र, यावेळी एक गोष्ट घडली ती म्हणजे, sodium nitroprusside दिल्यावर त्याचा रक्तदाब कमी होण्याऐवजी वाढला. रक्तदाब 70 असताना sodium nitroprusside देऊ नये असं लिहिलंय. मात्र, तरी मी दिलं. कारण, It was Resistant Heart Failure. sodium nitroprusside मुळे हृदयावरचा ताण कमी झाला. रक्तपुरवठा सुरळित झाला. हृदयाचे ठोके वाढले आणि रुग्ण नॉर्मल झाला. यातून बरा झालेला हा पहिला रुग्ण होता. असे आम्ही 130 रुग्ण पोलादपूरला केले. But this was not end of my research. कारण प्राथमिक आरोग्यकेंद्रात रुग्ण जास्त येतात. तिथला वैद्यकीय अधिकारी हा एमबीबीएस, बीएएमएस असतो. त्याला इथले रुग्ण तपासणे, हे ड्रग लावणं जमणार नाही. त्यामुळे माझं संशोधन हे इतरांना वापरता आलं पाहिजे यासाठी मी यासंदर्भातील अभ्यास केला. खूप वाचन केलं. यानंतरचा अहवाल लॅन्सेटमध्ये पब्लिश झाला. यानंतर ज्या-ज्या ठिकाणी हे औषध वापरलं गेलं तिथं मृत्यूदर कमी झाला. माझं ध्येय होतं की, this patient should be treated in phc only. कारण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. रात्रीची समस्या, जाण्या-येण्याची सुविधा नव्हती. अशा परिस्थितीत गरीबाला मोठ्या रुग्णालयात जाणे परवडणारे नव्हते. म्हणून मी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर जाऊन भाषणं दिलीत. डॉक्टरांना प्रशिक्षण दिलं. यानंतर मृत्यूदर कमी झाला.

प्रश्न - तुम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलात. तुम्ही फार महत्त्वाचंय, असं तुम्ही म्हणता. यामागची तुमची भूमिका काय?

उत्तर - मी एकदम गरिबीतून आलो. अशिक्षित घरात जन्मलो. मला जेवणासाठी वणवण करावी लागली. पुस्तक घेण्यासाठी मला मजूरी करावी लागली. मात्र, शिक्षण हे अमृत आहे. ते जगाला प्रज्वलित करतं. गरिबी दूर करायची असेल, जगाच्या स्पर्धेत शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. शिक्षण घेतलं, तुम्ही ज्ञान वाढवलंत, शास्त्रीय अभ्यास केला तर संशोधनाला जगात मान आहे. राजाला फक्त त्या राष्ट्रात मान असतो आणि शिक्षण झाल्यामुळे u can express yourself nice to others.

प्रश्न - Health Indiaची तुमची व्याख्या काय?

उत्तर - Young India is not Healthy India. Healthy India is Everybody Mental, Physical, Social Walefare. प्रत्येकाच्या घरी समाधान पाहिजे. प्रत्येकाला Enough Express करायची ताकद आली पाहिजे. Young India म्हणजे काय? आपल्याकडे तरुणांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. पण ही तरुणाई जर 10-10 वाजेपर्यंत झोपत असेल तर it is not healthy india. It is unhealthy India. 35 वर्षांखालील तरुणाईला रक्तदाबाची समस्या का येत आहे, मधुमेहाची समस्या का येत आहे, ते आळशी का होतायेत, स्मृतीभ्रंशची समस्या का होतेय? जपानमध्ये 100 वर्षांचं आयुष्य आहे. आपल्या भारतात जेमतेम 65 वर्षांचं आयुष्य आहे. जीवनशैली व्यवस्थित ठेवता येणे म्हणजे Healthy India. तसेच तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, तिथून तुम्ही देशासाठी योगदान देणे म्हणजे Healthy India.

Last Updated : Feb 8, 2022, 8:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.