ETV Bharat / state

आता अंगणवाडीचा कारभार होणार ऑनलाइन, भ्रष्टाचार करणाऱ्यांना बसणार चाप - online

रायगड जिल्ह्यातील 3 हजार 283 अंगणवाड्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अँड्रॉइड मोबाईल, सिम कार्ड व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागामार्फत मिळाली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार अँड्रॉइड मोबाईल
author img

By

Published : May 9, 2019, 12:13 PM IST

रायगड - अंगणवाड्यांचा कारभार आता मोबाईल अॅपच्या सहायाने ऑनलाइन व पारदर्शक होणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना चाप बसणार आहे. रायगड जिल्ह्यातील 3 हजार 283 अंगणवाड्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अँड्रॉइड मोबाईल, सिम कार्ड देण्यात येणार आहे. तसेच त्यांना याबाबत प्रशिक्षणही देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागामार्फत मिळाली आहे.

अंगणवाडी सेविकांच्या हातात आता अँड्रॉइड स्मार्ट फोन दिसणार आहेत. त्यामुळे अंगणवाडीचा सर्व कारभार आता ऑनलाईन होणार आहे. जिल्हा परिषदांतर्गत असलेल्या अंगणवाडीचा कारभार पूर्वीपासून रजिस्टरद्वारे चालत होता. त्यामुळे अनेकवेळा मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविकांमार्फत रजिस्टर मेंटेन करताना गडबड होत होती. तसेच शाळेतील असलेली पटसंख्या, मुलांना दिला जाणारा पोषण आहार याबाबत चालढकलपणा होत होता. त्यामुळे पोषण आहार घोटाळ्यासारखे प्रकार घडत होते.

केंद्र शासनाने अंगणवाडी सेविकांना अँड्रॉइड मोबाईल फोन देण्याचा निर्णय घेतला असून, पूर्ण कारभार हा आता ऑनलाइन पद्धतीने चालणार आहे. राज्य शासनानेही याबाबत आता पावले उचलली असून, पहिल्या टप्यात नांदेडमधील अंगणवाडी सेविकांना मोबाईलवरील अॅप कसे वापरावे याबाबत प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. तर रायगडमध्येही लवकरच सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे 3 हजार 92 सिमकार्ड आले असून, लवकरच मोबाईलसुद्धा येणार आहेत.

मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका यांना देण्यात येणाऱ्या मोबाईलमध्ये शासनाने तयार केलेले अॅप आहे. यामध्ये शासनाच्या योजना तसेच अंगणवाडीमध्ये 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांची माहिती, पोषण आहार माहिती, रोजची असलेली पटसंख्या याची माहिती रोजच्या रोज या कर्मचाऱ्यांना अपडेट करायची आहे. त्यामुळे भरलेली ही माहिती रोज शासनाकडे पोहचणार आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे.

Intro:पोषण अभियान अंतर्गत अंगणवाडी सेविकांना मिळणार अँड्रॉइड मोबाईल फोन

अंगणवाडीचा कारभार होणार आता ऑनलाइन

भ्रष्टाचार करणाऱ्यांना बसणार चाप

रायगड : केंद्र शासनाच्या पोषण अभियान कार्यक्रम अंतर्गत राज्यातील मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका यांना तांत्रिक मनुष्यबळासाठी अँड्रॉइड बेस मोबाईल फोन, सिम कार्ड डाटा प्लॅनसह देण्यात येणार असून यामुळे अंगणवाड्याचा कारभार आता मोबाईल अँपच्या सहाय्याने ऑनलाइन व पारदर्शक होणार आहे. रायगड जिल्ह्यातील 3283 अंगणवाड्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अँड्रॉइड मोबाईल फोन, सिम कार्ड व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागामार्फत माहिती मिळाली आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकाच्या हातात आता अँड्रॉइड स्मार्ट फोन भविष्यात दिसणार आहेत. तर या ऑनलाइन सुविधेमुळे पूर्वी होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे.Body:जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या अंगणवाडीचा कारभार हा पूर्वी पासून रजिस्टरद्वारे चालत होता. त्यामुळे अनेकवेळा मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविकामार्फत रजिस्टर मेंटेन करताना गडबड होत होती. तसेच शाळेतील असलेली पटसंख्या, मुलांना दिला जाणारा पोषण आहार याबाबत कुठेतरी चालढकल पणा होत होता. त्यामुळे पोषण आहार घोटाळ्यासारखे प्रकार घडत होते.

केंद्र शासनाने अंगणवाडी सेविका याना अँड्रॉइड मोबाईल फोन देण्याचा निर्णय घेतला असून पूर्ण कारभार हा आता ऑनलाइन पद्धतीने चालणार आहे. राज्य शासनानेही याबाबत आता पावले उचलली असून पहिल्या टप्यात नांदेडमधील अंगणवाडी सेविकांना मोबाईलवरील ऍप कसे वापरावे याबाबत प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. तर रायगडमध्ये ही लवकरच सेविकांना प्रशिक्षण सुरू होणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या महिलाव बाल कल्याण विभागाकडे 3092 सिम कार्ड आले असून लवकरच मोबाईल सुद्धा येणार आहेत. Conclusion:मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका याना देण्यात येणाऱ्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये शासनाने तयार केलेले ऍप आहे. यामध्ये शासनाच्या योजना तसेच अंगणवाडी मध्ये 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांची माहिती, पोषण आहार माहिती, रोजची असलेली पटसंख्या याची माहिती रोजच्या रोज या कर्मचाऱ्यांना अपडेट करायची आहे. त्यामुळे भरलेली ही माहिती रोज शासनाकडे पोहचणार आहे. त्यामुळे यामध्ये घडत असलेल्या अपप्रवृत्ती व भ्रष्टाचाराला आळा बसणार हे मात्र नक्की.

शासनाकडून देण्यात येणाऱ्या अँड्रॉइड मोबाईलमुळे अंगणवाडी सेविका ही स्मार्ट होणार असली तरी पटसंख्या वाढीकडेही लक्ष देणे तेव्हढेच गरजेचे आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.