ETV Bharat / state

अलिबाग बायपास रोडवर दुचाकींचा अपघात;एक ठार एक जखमी - एकाचा मृत्यू

कुरुळकडे जाताना लागणाऱ्या बायपास मार्गावर दुचाकी चालविताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून तो बाजूच्या झाडावर जाऊन जोरदार आदळला. या अपघातात चालक हा जागीच ठार झाला.

one died in road accident on alibag bypass road
अलिबाग बायपास रोडवर दुचाकींचा अपघात;एक ठार एक जखमी
author img

By

Published : May 7, 2020, 8:34 AM IST

रायगड- अलिबाग- रेवदंडा मार्गावर असलेल्या बायपास रोडवर दुचाकींचा अपघात होऊन एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटून हा अपघात झाला.

अलिबागमधील गोंधळपाडा येथून दोघेजण सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास( एमएच 06 बीएन 9021) या बुलेट दुचाकीवरून कुरुळकडे निघाले होते. कुरुळकडे जाताना लागणाऱ्या बायपास मार्गावर दुचाकी चालविताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून तो बाजूच्या झाडावर जाऊन जोरदार आदळला. या अपघातात चालक हा जागीच ठार झाला असून त्याचा मित्र जखमी झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच अलिबाग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने जखमीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.याप्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.