ETV Bharat / state

रायगडमध्ये पॅरासेलिंग करताना दोर तुटून बाप-लेक कोसळले; मुलाचा जागीच मृत्यू

बापलेक दोघेही मुरुड समुद्र किनाऱ्यावर असलेले पॅरासेलिंग करण्यासाठी गेले होते. पॅरासेलिंग उंच झेपावल्यानंतर काही वेळातच दोर तुटल्याने दोघेही वरून खाली कोसळले

अपघाताच्या ठिकाणचे दृश्य
author img

By

Published : May 25, 2019, 3:31 PM IST

Updated : May 25, 2019, 4:02 PM IST

रायगड - जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनारी पॅरासेलिंग करताना दोरी तुटून वडील आणि मुलगा खाली पडून अपघात झाला. यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला असून वडिलांना मुरुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान पॅरासेलिंग चालकावर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताच्या ठिकाणचे दृश्य

वेदांत गणेश पवार (वय १५) असे मृत मुलाचे नाव आहे. गणेश पवार हे आपला मुलगा वेदांत आणि कुटुंबासह पुण्यातील कसबा रोड येथून मुरुड येथे फिरायला आले होते. सर्वजण समुद्रावर मौजमजा करीत सुट्टीचा आनंद लुटत होते. त्यावेळी पवार बाप-लेक दोघेही मुरुड समुद्र किनाऱ्यावर असलेले पॅरासेलिंग करण्यासाठी गेले होते. पॅरासेलिंग उंच झेपावल्यानंतर काही वेळातच दोर तुटल्याने दोघेही वरून खाली कोसळले. या अपघातात वेदांत खाली पडल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश पवार हे गंभीर जखमी झाले. वेदांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Intro:
आकाशात पॅरासेलिंग करताना दोरी तुटून बापलेक पडले खाली

मुलाचा जागीच मृत्यू तर वडील गंभीर जखमी

मुरूड समुद्र किनाऱ्यावरील घटना

पॅरासेलिंग चालकांवर गुन्हा दाखल

रायगड : मुरुड समुद्रकिनारी पॅरासेलिंग करताना दोरी तुटून बापलेक खाली पडून अपघात झाला. या अपघातात मुलगा वेदांत गणेश पवार (15) हा जागीच ठार झाला असून वडील गणेश पवार गंभीर जखमी झाले आहेत. गणेश पवार यांना मुरुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. तर पॅरासेलिंग चालकांवर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Body:गणेश पवार हे आपलं मुलगा वेदांत व कुटूंबासह पुणे, कसबा रोड येथून मुरुड येथे फिरण्यास आले होते. त्यावेळी समुद्रावर मौजमजा करीत सुट्टीचा आनंद लुटत होते. मुरुड समुद्र किनाऱ्यावर असलेल्या पॅरासेलिंग करण्यासाठी पवार बापलेक दोघेही गेले होते. पॅरासेलिंग उंच झेपावल्यानंतर काही वेळातच दोर तुटल्याने दोघेही वरून खाली कोसळले.Conclusion:या अपघातात वरून वेदांत हा पडल्यानंतर जागीच ठार झाला. तर गणेश पवार हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर जखमी गणेश पवार यांना मुरुड येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तर वेदांत याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अलिबाग जिल्हा रुगणल्यात पाठविण्यात आले आहे. या अपघाताबाबत पॅरासेलिंग चालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मुरुड पोलीस ठाण्यात सुरू होती.
Last Updated : May 25, 2019, 4:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.