रायगड - जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण हे जास्त असले तरी शहरात फुटपाथ अपघात घटना घडलेल्या नाहीत. मात्र असे असले तरी जिल्ह्यातील शहरातील स्थानिक प्रशासनाने नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथची सुविधा निर्माण केली नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना गर्दीमध्ये जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.
जिल्ह्यातील काही शहरात फुटपाथ केलेले असले तरी छोट्या व्यवसायिकांना ते आंदण दिले आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. रस्त्यावर चालण्याचा पहिला अधिकार हा पादचाऱ्यांचा आहे. मात्र, शहरातील रस्त्यावर वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे चालणाऱ्या पादचाऱ्यांना चालताना कसरत करावी लागत आहे. मुंबई, पुणे, ठाणे तसेच इतर मोठ्या शहरात रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांसाठी फुटपाथची सुविधा करण्यात आलेली असते. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या शहरामध्ये फुटपाथ सुविधा ही मात्र कुठेच पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे वाहनांच्या गर्दीतून वयस्कर व लहान मुले यांना फुटपाथ नसल्याने रस्त्याच्या कडेने चालावे लगत असते. त्यामुळे अनेकवेळा वाहनांची ठोकर बसून अपघात होण्याची शक्यता वाढत आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या लसीकरणात भारताला प्राधान्य; संयम बाळगण्याचे सीरमकडून देशांना आवाहन
फुटपाथ हे छोट्या व्यवसायिकांना आदण
हेही वाचा-संगमनेरच्या ग्रुपकडून करचुकवेगिरीचा संशय; आयटी विभागाचे राज्यात ३४ मालमत्तांवर छापे
फुटपाथ अपघाताच्या घटना जिल्ह्यात नाहीत, पण...