रायगड - खालापूर तालुक्यातील कर्जतकडे जाणाऱ्या मार्गावर निर्माते नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ आहे. येथे शूटिंगसाठी बनविलेल्या किल्ल्याच्या पाठिमागील सेटला आग लागली. यात सेट जळाला आहे. मोठ्या प्रमाणात आग लागली असून धुरांचे लोट 3 ते 4 किमी अंतरावरुनही दिसले. जोधा अकबर चित्रपटासाठी बनविलेल्या किल्ल्यापर्यंत आग पोहोचली.
आग लागल्याची माहिती मिळताच कर्जत नगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे समजले आहे. वेळीच दखल न घेतल्याने स्टुडिओच्या आतील भागातील गवत जळले. त्यामुळे जोधा अकबर चित्रपटासाठीसाठी बनविलेल्या किल्ल्यापर्यंत आग पोहोचली. यामुळे सेटच्या काही भागाला आग लागली. मोठ्या प्रमाणात आग लागली. जवळपास 3 अग्निशमन दलाच्या गाड्या आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा - पप्पांनी, केंद्राकडे तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला
हेही वाचा - सख्ख्या बहिणीचे नवऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, महिलेने केला तीन वर्षीय भाच्याचा खून