रायगड - अलिबाग किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकून तीन तास होत आले आहेत. मात्र अद्याप वादळी वाऱ्याने परिसर घेरला आहे. कालपासूनच पावसाला सुरुवात झाली. आज मुसळधार सरी बरसल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पेणमध्ये घरांचे पत्रे उडाले, मासेमारी नौका, पपई, नारळ बागा यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
इंटरनेटसह अन्य संपर्क यंत्रणा विस्कळीत झाल्याने प्रशासनालाही जिल्ह्यातील परिस्थिती समजून घेण्यात अडचणी येत आहे. समुद्र खवळला आसून ताशी 110 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. वादळ पुढे सरकत असले तरिही पेण, अलिबाग, नागोठणे, रोहा तालुक्यात मात्र मोठ्या प्रमाणात फटका बसलाय.
कालपासूनच वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती. वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी देखील घेतली.