रायगड - पेण नगरपरिषदेच्या मैदानावर भरलेल्या स्वररंगच्या पेण फेस्टिवलमध्ये झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत अलिबागच्या डी.एन.जीमचा निनाद जाधव 'रायगड श्री 2019' चा विजेता ठरला. तर, जय महाराष्ट्र जीमच्या अक्षय खोतने 'बेस्ट पोजर'चे पारितोषिक पटकावले.
हेही वाचा - बीसीसीआयच्या 'बॉस'ला क्लीन चीट
स्वररंग पेण तर्फे रायगड डिस्ट्रीक्ट बॉडीबिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने व प्रायोजक एस.आर.फिटनेस क्लब पेण यांच्या सौजन्याने ही स्पर्धा पेण फेस्टिवलमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत 55 किलो वजनी गटात सुमीत शेडगे (उतेकर जिम), 60 किलो वजनी गटात महेंद्र पाटील ( बिग जिम पनवेल), 65 किलो वजनी गटात जयेंद्र मयेकर ( स्लिमवेल जिम पनवेल), 70 किलो वजनी गटात अक्षय खोत ( जय महाराष्ट्र जिम) व खुल्या गटात निनाद जाधव ( डी.एन.जिम अलिबाग) या स्पर्धकांनी प्रथम क्रमांक पटकावला.
विजेत्यांना स्वररंगचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र साळवी, कार्याध्यक्ष ललित पाटील, मार्गदर्शक वैकुंठ पाटील, शिवसेना नेते रशाद मुजावर, कोल्हापूर शिवाजीनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय.एस.पाटील, बॉडीबिल्डर फेडरेशनचे अध्यक्ष सुनिल मुंडे, उपाध्यक्ष नगरसेवक निवृत्ती पाटील, महाराष्ट्र श्री अमित पाटील, एस.आर.फिटनेसचे सुभाष जैन, दिशांक जैन, ट्रेनर कमलेश, तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हरिशचंद्र शिंदे, बीजेपी मुंबई शहर अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा, शिववसेनेचे विधानसभा युवा अधिकारी चेतन मोकल, ओंमकार दानवे, सचिन पाटील, दीपक समेळ, साजेश माने, योगेश चौधरी, इम्तियान सय्यद, पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी, स्वररंगचे उपाध्यक्ष सुनिल पाटील, अनिकेत साळवी, सचिव कौस्तुभ भिडे, सहसचिव मृगज कुंभार आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून राकेश पाटील, प्रशांत सोनावणे, मनोज भगत, दिलीप निकम, कैलास पाटील, मनोहर पाटील, प्रकाश म्हात्रे आदींनी काम पाहिले.
मेनफिजिक्स विनर मुंबई श्री इम्तियान सय्यद व प्रसाद पाटील यांनी यावेळी विलोभनीय असे शरीर सौष्ठवतेचे प्रदर्शन सादर केले. स्पर्धेचे समालोचन रोशन बाइग यांनी केले. या स्पर्धेला सर्वच स्तरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. फेस्टिवलचे प्रांगण हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीने भरून गेले होते. सचिव कौस्तुभ भिडे यांनी आभार प्रदर्शन केले.