ETV Bharat / state

Mumbai Pune Highway Accident : मुंबई-पुणे महामार्गावर टँकर उलटल्याने भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू - मुंबई-पुणे महामार्गावर भीषण तिघांचा मृत्यू

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रोपोलिन गॅस टँकर उलटल्याने भीषण अपघात झाला ( Mumbai Pune Highway Tanker Accident ) आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला ( Mumbai Pune Highway Accident Three Death) आहे.

Mumbai Pune Highway Accident
Mumbai Pune Highway Accident
author img

By

Published : May 9, 2022, 4:15 PM IST

खालापूर ( रायगड ) - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रोपोलिन गॅस टँकर उलटल्याने भीषण अपघात झाला ( Mumbai Pune Highway Tanker Accident ) आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला ( Mumbai Pune Highway Accident Three Death) आहे. हा टँकर पुण्याहून-मुंबईकडे खोपोलीजवळ घडली आहे. दरम्यान, महामार्गावरच टँकर उलटल्याने दोन्ही बाजूची वाहतुक थांबवण्यात आली आहे.

मिळालेली माहिती अशी की, खोपोली एक्झिट जवळ उतारावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे टँकर पुणे लेनवर येऊन उलटला. यावेळी टँकरला तीन गाड्या धडकल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. बोरघाट पोलीस यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था घटनास्थळी मदत करत आहे. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य केले.

मुंबई-पुणे महामार्गावर टँकर उलटल्याने भीषण अपघात

भरधाव गॅस टँकर उलटला - सुदैवाने टँकरमधील गॅसची गळती झाली नाही. सध्या टँकर उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खबरदारी म्हणून खोपोली अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पाण्याचा मारा करण्यासाठी सज्ज आहे.

चालक जखमी - या अपघातात गॅस टँकरचा चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुणे येथे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. महामार्गावरील दोन कार क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आल्या आहेत. खोपोली अग्निशमन विभागाच्या मदतीने टँकर महामार्गावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा - Akole Biroba Yatra : अकोले तालुक्यात अनोखी परंपरा; बिरोबाच्या यात्रेत आगीचा थरार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.