रायगड - रोहा मुरुड परिसरात औषध निर्माण प्रकल्प होत असताना तेथील शेतकरी, मच्छिमार, बागायतदार यांचे प्रश्न सुटणे गरजेचे आहे. येणाऱ्या प्रकल्पात स्थानिक तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा सरकारचा विचार आहे. या परिसरात येणारा औषध निर्मिती प्रकल्प हा प्रदूषण विरहित प्रकल्प आहे. त्यामुळे येथील शेतकरी, मच्छिमार, बागायतदार आणि स्थानिकांच्या नोकरीच्या प्रश्नासाठी आग्रही पद्धतीची भूमिका आम्ही मांडली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी औषध निर्मिती प्रकल्पाबाबत दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील रोहा, मुरुड या तालुक्यात 17 गावातील जमिनीवर औषध निर्मिती प्रकल्प राज्य शासन उभारणार आहे. स्थानिकांना विश्वासात घेऊन प्रकल्प उभारण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या बैठकीला रायगडचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार महेंद्र दळवी हे उपस्थित होते. 17 गावातील स्थानिक ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध आहे. याबाबत खासदार सुनील तटकरे यांना पेण वडखळ येथे कार्यक्रमास आले असता विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. पेण तालुक्यातील वडखळ, मळेघर, डोलवी, गडब, आमटेम येथील पाच विद्यमान सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमानंतर खासदार तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुरुड रोहा औषध निर्मिती प्रकल्पासाठी स्थानिकांच्या प्रश्नासाठी आग्रही भूमिका - खासदार सुनील तटकरे - मुरुड रोहा औषध निर्मिती प्रकल्प
रोहा मुरुड परिसरात औषध निर्माण प्रकल्प होत असताना तेथील शेतकरी, मच्छिमार, बागायतदार यांचे प्रश्न सुटणे गरजेचे आहे. येणाऱ्या प्रकल्पात स्थानिक तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा सरकारचा विचार आहे. अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.