रायगड - खालापूर तालुक्यातील चौक येथील मोरबे धरण 28 सप्टेंबर रोजी ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाणी सोडण्यात आले असून काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कधीकाळी धरणातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे नदीकाठच्या लोकांना अचानक पाणी सोडल्यामुळे माहिती पडत नसे.
खालापूर तालुक्यातील मोरबे धरण हे मोठं धरण आहे. या धरणाचा पाणी पुरवठा नवी मुंबई या भागाला पुरवण्यात येतो. महाराष्ट्रातील बहुतांशी धरणे भरून ओव्हरफ्लो होऊ लागले. परंतु दिनांक 28 सप्टेंबर रोजी दुपारपासून तीन - चार तास मुसळधार पावसाने मोरबे धरण अखेर भरले आहे. मोरबे धरणाचे ओव्हरफ्लो पाणी गंगा नदीला मिळते. त्यामुळे नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला असून आपटा, खारपाडा, गुळ सुंदा, खालचा कराडा, वावेघर, कालीवली, चावणे या भागाला धोका होऊ शकतो.
![मोरबे धरण ओव्हरफ्लो](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-rai-02-marbedamoverfull-slug-mhc10085_28092021192108_2809f_1632837068_286.jpg)
तसेच महापुरात अनेक गुरे-ढोरे, माणसे व इतर घरे, कंपन्या पातालगंगा नदीकाठावरील लोकांना बरेचसे नुकसान सोसावे लागत होते. त्यामुळे प्रशासनाने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.