खालापूर (रायगड) - शहरामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून माकडांचा वावर वाढला असून, बऱ्याच ठिकाण त्यांचा धुडगूस पाहायला मिळत आहे. सतत लागणारे वणवे, लाकूडतोड यामुळे जंगल नष्ट होऊ लागल्यामुळे प्राण्यांना खायला प्यायला मिळत नसल्याने जंगली प्राण्यांनी शहराकडे धाव घेतली आहे.
खायला मिळेल या आशेने माकडांची शहराकडे धाव -
त्याच अनुषंगाने काही माकडे खालापूर शहरामध्ये उड्या मारत फिरताना दिसत आहे. भुकेली असल्यामुळे खायला काही मिळेल या उद्देशाने ती घरोघरी फिरत असल्याचे दिसून आले आहे.
माकडांना कोणतेही खाद्यपदार्थ न देण्याचे वनविभागाचे आवाहन -
याबाबत खालापूर वनपाल यांच्याकडे तक्रार केली असता त्यानी सांगितले आहे, की त्यांना काहीही खायला टाकू नका. त्यामुळे त्यांना या ठिकाणी वास्तव्य करण्याची सवय लागेल, आणि ते इकडुन परत जाणार नाहीत. तसेच लहान मुलांनाही इजा होण्याची शक्यता आहे, असेही परीमंडळ वन अधिकारी आर.वि.नागोठकर यांनी म्हटले आहे.